कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे झोप येत नाही- लालू प्रसाद यादव यांच्या नव्या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 11:53 AM2018-09-03T11:53:37+5:302018-09-03T11:54:07+5:30

कुत्र्यांच्या भुंकण्याबरोबरच त्यांच्या खोलीतील बाथरूमची स्थिती अत्यंत वाईट असल्याची तक्रार लालू यांनी केली आहे. या बाथरुममधून दुर्गंधी येते असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे लालूप्रसाद यांनी काही नव्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.

Family, party worried as barking dogs disturb Lalu’s sleep at Ranchi hospital | कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे झोप येत नाही- लालू प्रसाद यादव यांच्या नव्या मागण्या

कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे झोप येत नाही- लालू प्रसाद यादव यांच्या नव्या मागण्या

Next

रांची-  माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव सध्या रांचीमधील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्था (रिम्स) या रुग्णालयात उपचार घेत आहेत. रिम्स रुग्णालयाच्या आसपास असणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आपल्याला झोप येत नाही अशी तक्रार लालू प्रसाद यांनी केली आहे. त्यांचे निकटवर्तिय भोला यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. कुत्र्यांच्या भुंकण्याबरोबरच त्यांच्या खोलीतील बाथरूमची स्थिती अत्यंत वाईट असल्याची तक्रार लालू यांनी केली आहे. या बाथरुममधून दुर्गंधी येते असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे लालूप्रसाद यांनी काही नव्या मागण्या समोर ठेवल्या आहेत.




लालूप्रसाद यांनी आपल्याला पेइंड वॉर्डमध्ये भरती करावे अशी मागणी केली आहे. या वॉर्डमध्ये जाण्यासाठी लागणारी सर्व फी आपण भरण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. लालूप्रसाद यांच्या काही तपासण्या सध्या सुरु आहे. रक्तामध्ये इन्फेक्शन तसेच मधुमेह अशा अनेक आजारांना लालू प्रसाद तोंड देत आहेत.  त्यांचा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहे. रविवारी त्यांचा इसीजी काढण्यात आला. त्याचा अहवाल सामान्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी लालू प्रसाद यांनी न्यायलयात आत्मसमर्पण केले होते. न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत बिरसा मुंडा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले होते. सध्या कारागृहाच्या निगराणीखाली त्यांच्यांवर उपचार सुरु आहेत. आपल्याला उपचारासाठी जामिन वाढवून मिळावा अशी मागणी लालूप्रसाद यांनी 25 ऑगस्टरोजी केली होती मात्र न्यायलयाने तो नामंजूर करत 30 ऑगस्टरोजी आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता. 

Web Title: Family, party worried as barking dogs disturb Lalu’s sleep at Ranchi hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.