#Metoo आरोप निखालस खोटे, हा बदनामीचा ‘अजेंडा’ - एम. जे. अकबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 05:50 AM2018-10-15T05:50:14+5:302018-10-15T05:51:24+5:30

- सुरेश भटेवरा  नवी दिल्ली : यौन शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष ...

false allegations against me - M. J. Akbar | #Metoo आरोप निखालस खोटे, हा बदनामीचा ‘अजेंडा’ - एम. जे. अकबर

#Metoo आरोप निखालस खोटे, हा बदनामीचा ‘अजेंडा’ - एम. जे. अकबर

Next

- सुरेश भटेवरा 

नवी दिल्ली : यौन शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष हमखास बाधते. बेजबाबदार आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे’, असा इशारा देत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी या प्रकरणात अखेर आपले हात झटकले.


अकबर संपादक असताना आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचे तसेच यौन शोषणांचे गंभीर आरोप ‘मी ट’ू चळवळीत ११ महिला पत्रकारांनी केले. त्यानंतर नायजेरिया दौरा अर्धवट सोडून रविवारी सकाळीच अकबर परतले. विमानतळावर येताच शक्यतो मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र प्रश्नांचा भडिमार झाल्यावर ‘मी माझे निवेदन नंतर देईन’, इतके त्रोटक उत्तर देत ते निघून गेले. मात्र त्यानंतर त्यांनी निवेदन जारी केले. ते म्हणाले, या आरोपांबाबत माझे वकील दखल घेणार आहेत. लोकसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच आरोप का होताहेत? काही महिलांनी
२० वर्षे आधी झालेल्या कथित अत्याचाराविरोधात आवाज उठविला आहे. 

राजीनामा नाहीच
मी टू चळवळीत महिलांनी केलेल्या आरोपांनंतर अकबर मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे म्हटले जात होते. काँग्रेस, माकपासह अनेकांनी अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पंतप्रधान मोदी अकबर यांचा दौºयावरून परतताच राजीनामा घेतील, असेही बोलले जात होते. मात्र अद्याप तसे घडले नाही.

पंतप्रधान मोदींनी मौन सोडावे- काँग्रेस
अकबर यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गप्प आहेत. त्यांचे हे मौन अस्वीकार्य आहे. सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी मौन त्वरित सोडले पाहिजे, अशी मागणी राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी केली. जे पंतप्रधान बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संकल्प जाहीर करतात, महिलांच्या प्रतिष्ठेविषयी वारंवार बोलतात, ते आज गप्प कसे? हा विषय केवळ सरकारच्या नैतिकतेशी संबंधित नाही तर पंतप्रधानांनी ज्यांना सन्मानाने उच्चपदांवर बसवले त्यांची प्रतिष्ठाही या आरोपांमुळे पणाला लागली आहे, असेही शर्मा म्हणाले.

Web Title: false allegations against me - M. J. Akbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.