मनोहर पर्रिकरांच्या नावाने व्हायरल झालेल्या 'त्या' पोस्टमागचं वास्तव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 04:56 PM2018-03-23T16:56:53+5:302018-03-23T16:56:53+5:30

मनोहर पर्रिकरांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालाय. परंतु, त्यामागचं वास्तव वेगळंच आहे. 

The fact behind viral post regarding Manohar Parrikar | मनोहर पर्रिकरांच्या नावाने व्हायरल झालेल्या 'त्या' पोस्टमागचं वास्तव!

मनोहर पर्रिकरांच्या नावाने व्हायरल झालेल्या 'त्या' पोस्टमागचं वास्तव!

Next

नवी दिल्लीः गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. एक कर्तव्यनिष्ठ आणि सच्चे राजकारणी म्हणून सुपरिचित असलेल्या पर्रिकरांबद्दल सगळ्यांनाच आदर वाटतो. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबतही प्रत्येकालाच काळजी लागून राहिलीय. या पार्श्वभूमीवर, पर्रिकरांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालाय. परंतु, त्यामागचं वास्तव वेगळंच आहे. 

माणूस आयुष्यभर पैसा, प्रसिद्धी, मानमरातब याच्या मागे लागतो, पण नातीगोती जपायला विसरतो आणि आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्याकडे काहीच नसतं, अशा आशयाची - जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी पोस्ट मनोहर पर्रिकर यांच्या नावाने फिरतेय. अमेरिकेत उपचार घेतानाचे त्यांचे हे शब्द असल्याचं त्यात म्हटलंय. पण, हा सूर माणसं जोडणाऱ्या, मनमिळाऊ, अजातशत्रू मनोहर पर्रिकरांचा असूच शकत नाही, हे ते वाचताना जाणवलं आणि 'लोकमत डॉट कॉम'ने त्याची खातरजमा करून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, विचित्र प्रकार समोर आला. 

मनोहर पर्रिकर यांच्या नावाने फिरणारी ही पोस्ट याआधी अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या नावाने इंग्रजीत फिरली होती. 'स्टीव्ह जॉब्स यांचे मृत्युशय्येवर असतानाचे शब्द' म्हणून हा मेसेज २०१५ मध्ये व्हायरल झाला होता. पण, तो धादांत खोटा असल्याचा खुलासा त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याच मेसेजचा मराठी अनुवाद करून आता ही पोस्ट पर्रिकरांच्या नावाने पसरवली जातेय. त्यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे तुम्हाला जर हा मेसेज आला, तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि तो फॉरवर्ड तर अजिबातच करू नका. 

तुम्हीच बघा...

.............

१०० वेळा वाचला तरीही , पुन्हा १०१ वेळा सर्व वाचायला आवडेल  असा हा लेख ......

Manohar Parrikar CM of Goa admitted in USA त्यांचे हे शब्द ... 👇

Political क्षेत्रात मी उत्तुंग यशाची शिखरं गाठली....*
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले....

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी political status माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा समाजसेवा करणे.

सातत्यानं केवळ politics मागे धावण्यामुळे माणूस  'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो... अगदी माझ्यासारखा...

आयुष्यभर मी जी संपत्ती and political मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …(defence cha nahin)

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे ministers ठेवता येतात... पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही...

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते  "आपलं आयुष्य" " काळ " " समय ".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

स्वत:कडे दुर्लक्ष  करू नका... स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा...

 लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा, आणि माणसं जपायला हवीत... आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...!!!
MANOHAR GOPALKRISHNA PARRIKAR
💐💐💐💐💐💐💐

...............
 
“I reached the pinnacle of success in the business world. In others’ eyes, my life is an epitome of success.

However, aside from work, I have little joy. In the end, wealth is only a fact of life that I am accustomed to.

At this moment, lying on the sick bed and recalling my whole life, I realize that all the recognition and wealth that I took so much pride in, have paled and become meaningless in the face of impending death.

In the darkness, I look at the green lights from the life supporting machines and hear the humming mechanical sounds, I can feel the breath of god of death drawing closer …

Now I know, when we have accumulated sufficient wealth to last our lifetime, we should pursue other matters that are unrelated to wealth …

Should be something that is more important:

Perhaps relationships, perhaps art, perhaps a dream from younger days

Non-stop pursuing of wealth will only turn a person into a twisted being, just like me.

God gave us the senses to let us feel the love in everyone’s heart, not the illusions brought about by wealth.

The wealth I have won in my life I cannot bring with me. What I can bring is only the memories precipitated by love.

That’s the true riches which will follow you, accompany you, giving you strength and light to go on.

Love can travel a thousand miles. Life has no limit. Go where you want to go. Reach the height you want to reach. It is all in your heart and in your hands.

What is the most expensive bed in the world?

Sick bed …

You can employ someone to drive the car for you, make money for you but you cannot have someone to bear the sickness for you.

Material things lost can be found. But there is one thing that can never be found when it is lost — Life.

When a person goes into the operating room, he will realize that there is one book that he has yet to finish reading — Book of Healthy Life.

Whichever stage in life we are at right now, with time, we will face the day when the curtain comes down.

Treasure Love for your family, love for your spouse, love for your friends.

Treat yourself well. Cherish others.”

- STEVE JOBS
 

Web Title: The fact behind viral post regarding Manohar Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.