Jammu And Kashmir : अनंतनाग परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 08:41 AM2019-06-17T08:41:46+5:302019-06-17T08:42:39+5:30

सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला.

Exchange of fire underway between security forces & terrorists in Anantnag. | Jammu And Kashmir : अनंतनाग परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक 

Jammu And Kashmir : अनंतनाग परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक 

googlenewsNext

अनंतनाग - जम्मू काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आपलं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. अनंतनाग परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणेत जोरदार चकमक सुरु आहे. सुरक्षा यंत्रणांनी परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी अनंतनाग परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. जवानांदेखील दहशतवाद्यांच्या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर दिलं. 

शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं.  सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा  जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये चकमक सुरू झाली होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं


शोपियान जिल्ह्यामध्येही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये 3 जूनच्या पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. शोपियान जिल्ह्याच्या द्रागड सुगान भागात 31 मे रोजी दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरु होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये 29 मे रोजी चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं

काही दिवसांपूर्वी अनंतनाग येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 5 जवान शहीद झाले तर अन्य 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनंतनाग दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अहमद जरगर याला मानलं जातंय. या हल्ल्यामागे अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे. सूत्रांची माहिती अशी आहे की, अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत एकट्याने असा हल्ला करण्याची क्षमता नाही. त्यामुळे जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी हातमिळवणी करुन अल-उमर-मुजाहिदीनने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला असावा. जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवाद अहमद जरगर हातपाय पसरण्याचं काम करत आहे.   

Web Title: Exchange of fire underway between security forces & terrorists in Anantnag.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.