ex mizoram governor aziz qureshi objectionable remarks on pm modi about pulwama attack | ‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट’
‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट’

भोपाळ : मिझोराम राज्याचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अजीज कुरैशी यांनी तर पुलवामा दहशतवादी हल्ला म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट असल्याचा धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

'तुम्ही नियोजन करुन पुलवामा हल्ला तर घडवून आणला. मात्र, 42 जवानांची हत्या करुन त्यांच्या मृत्यूचे आपण राजकीय भांडवल म्हणून वापर करत असाल तर जनता ते तुम्हाला करु देणार नाही', असे अजीज कुरैशी यांनी म्हटले आहे.


दरम्यान, पुलवामा दहशतादी हल्ल्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे. याआधी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. ते म्हणाले होते, 'पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात फिक्सिंग आहे. हा हल्ला हातमिळवणीशिवाय शक्य नाही. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा द्यायला पाहिजे.'

('पुलवामा हल्ल्यामागे नरेंद्र मोदी - इम्रान खान यांची फिक्सिंग')

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईवर अनेक शंका उपस्थित करुन यावर राजकारण करण्यात येत आहे. 
 


Web Title: ex mizoram governor aziz qureshi objectionable remarks on pm modi about pulwama attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.