दरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:19 AM2019-01-24T04:19:22+5:302019-01-24T04:19:34+5:30

आपण लहानपणी रेल्वेस्थानकाबाहेर चहा विकायचो, अशी माहिती गेल्या लोकसभा निवडणुकांच्या आधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आणखी एक नवी माहिती दिली आहे.

Every year I live in the forest for five days - Narendra Modi | दरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी

दरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली : आपण लहानपणी रेल्वेस्थानकाबाहेर चहा विकायचो, अशी माहिती गेल्या लोकसभा निवडणुकांच्या आधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आणखी एक नवी माहिती दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना आपण दर दिवाळीत पाच दिवस जंगलात जाऊ न राहायचो, त्या काळात आपण केवळ स्वत:वरच लक्ष केंद्रित करायचो आणि स्वत:मध्ये डोकावून पाहायचो, असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे.
तरुणांनी आपल्या धकाधकीच्या जीवनातून स्वत:साठी काही वेळ द्यावा, स्वत: विचार करावा, त्यामुळे इतरांच्या तुलनेत तुम्हाला स्वत:लाच समजून घेणे सोपे होईल आणि त्यामुळे तुम्हाला बाहेरील शक्तींपासून प्रभावित होण्याची गरज भासणार नाही, असा सल्ला देताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या तरुणपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, आपण १७ वर्षांचे असताना संघाच्या सहलीसाठी हिमालयात गेलो होतो. तेथून आल्यानंतर दुसºयांच्या सेवेसाठी जगायचे असल्याचे आपण नक्की केले. त्यामुळे काही काळ आपण काकांच्या अहमदाबाद येथील कँ टीनमध्ये काम केले होते.
>संघामुळे लोकांशी संपर्क
पुढे संघाचा पूर्णवेळ प्रचारक बनल्यावर संघाच्या कार्यालयाची साफसफाई, भांडी घासणे, इतरांसाठी चहा व खाद्यपदार्थ बनवणे, अशी अनेक कामे केली, असे सांगून मोदी मुलाखतीत म्हणाले की, त्यानंतर दरवर्षी आपण दिवाळीच्या पाच दिवसांत जंगलात जाऊ न राहायचो. स्वच्छता आणि पाणी असलेल्या भागांत राहायचो. तिथे मी स्वत:बाबत विचार करायचो आणि स्वत:शीच बोलायचो. यामुळे स्वत:च्या जीवनात डोकावून पाहणे मला शक्य झाले.

Web Title: Every year I live in the forest for five days - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.