अरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 09:21 AM2018-02-09T09:21:41+5:302018-02-09T09:24:27+5:30

अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे

Every family of Bomja Village located in Arunachal Pradesh becomes Crorepati | अरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती

अरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती

googlenewsNext

गुवाहाटी - अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे अगदी खरं आहे. बोमजा असं या गावाचं नाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आज करोडो रुपये आहेत. आता हे नेमकं कसं झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की, बोमजा गाव चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात आहे. भारतीय लष्कराला या गावात आपला तळ उभारायचा आहे त्यामुळे त्यांनी गावाची 200 एकर जमीन अधिग्रहण केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या जमिनीच्या मोबदल्यात गावाला 40.80 कोटींहून जास्त रक्कम दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गावात फक्त 31 कुटुंबं राहतात, त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला एक कोटीहून जास्त रक्कम येत आहे. 

एका कुटुंबाला सर्वात जास्त 6.73 कोटींचा मोबदला मिळाला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावक-यांना त्यांच्या हक्काची रक्कम सुपूर्त केली आहे. यासोबतच आशियातील समृद्ध गावांच्या यादीत बोमजा गावाचा समावेश झाला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावात सर्वात जास्त समृद्ध गाव मानलं जातं. सीमेवरील चीनच्या वाढत्या हालचाली पाहता भारतानेही या ठिकाणी विकासाच्या योजना आणि कामे सुरु केली आहेत. 

बोमजा गावातील 31 कुटुंबांपैकी 29 कुटुंबांना 1.09 कोटी रुपये मोबदला म्हणून मिळाले आहेत. उर्वरित दोन कुटुंबांपैकी एका कुटुंबाला 2.45 कोटी, तर दुस-या कुटुंबाला 6.73 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेश योग्य दिशा आणि प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री पेमा खांडू बोलले आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने राज्याच्या विकासाला गती मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. खासकरुन रेल्वे, हवाई मार्ग आणि रस्त्यांच्या विकासावर लक्ष दिलं जात असून डिजिटल क्षेत्रातही राज्य विकास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Web Title: Every family of Bomja Village located in Arunachal Pradesh becomes Crorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.