'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 05:00 PM2017-12-07T17:00:46+5:302017-12-07T17:46:24+5:30

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या असभ्य टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला आहे. 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं आहे.

'Even if you are of low caste, your work has been made big', Narendra Modi's turn to Congress | 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार

'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर पलटवार

Next
ठळक मुद्देकाँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या असभ्य टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पलटवार'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत'मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका केली होती

सूरत - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या असभ्य टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला आहे. 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं आहे. सूरतमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. ते बोलले की, 'उच्च आणि नीच या गोष्टी त्यांच्या संस्कारातच नाहीत. या सर्व गोष्टी त्यांनाच लख लाभो'. याआधी मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका केली होती.  

गुजरातची जनता भाजपाला मतं देऊन आपलं उत्तर देईल असा दावा मोदींनी केला आहे. काँग्रेसने गुजरातच्या मुलासाठी 'नीच' शब्दाचा वापर केला असल्याचं मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या त्या वक्तव्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांना 'मौत का सौदागर' संबोधण्यात आलं होतं. मोदींनी मणिशंकर अय्यर यांच्या टीकेला उत्तर न देण्याचं आवाहन भाजपा नेत्यांना केलं आहे. 



 


'काँग्रेस नेते वापरत असलेली भाषा लोकशाहीला अनुसरुन नाही. काँग्रेसचा एक नेता जो प्रतिष्ठित संस्थेत शिकला, केंद्रीय मंत्री राहिला तो म्हणतो मोदी नीच आहेत. हे अपमानजनक आहे. ही मोघलाई विचारसरणी आहे', अशी टीका मोदींनी केली. अशाप्रकारची भाषा वापरणा-यांनी गुजरातची जनता चांगलं उत्तर देईल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. 'तुम्ही मला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून पाहिलं आहे. माझ्यामुळे कोणाला आपली मान खाली घालायला लागली का ? मी कोणतीही लाजिरवाणी गोष्ट केली का ? मग ते मला नीच का म्हणत आहेत', असे सवाल मोदींनी विचारले. 



'हो मी गरिब समाजातून आलो आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण गरिब, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजासाठी काम करण्यात घालवणार आहे. ते आपली भाषा आपल्याकडे ठेवू शकतात. आम्ही आमचं काम करु', असं मोदी म्हणाले. 'त्यांना मला नीच म्हणू दे, आम्ही उत्तर देणार नाही. आमच्याकडे ही विचारसरणी नाही, त्यांच्याकडे आहे त्याबद्दल अभिनंदन. आम्ही मतदानपेटीतून त्यांना उत्तर देऊ', असं मोदींनी सांगितलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटनावेळी बोलताना जे राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या नावाने मतं मागतात त्यांना बाबासाहेबांपेक्षा आजकाल भोले बाबांची आठवण येऊ लागलीय, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर हल्लाबोल केला. दरम्यान, पटेलांप्रमाणेच आंबेडकरांवरही काँग्रेसने कसा अन्याय केला, हेदेखील मोदींनी सांगितलं. 1992 मध्ये नरसिंहराव हे पंतप्रधान असताना बाबासाहेबांच्या नावाने अशा केंद्राची संकल्पना मांडली गेली होती. मात्र इतकी वर्षे हे काम पूर्ण करण्याची तसदी कुणी घेतली नाही, असा आरोप मोदींनी केला.


पंतप्रधानांच्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर इतके संतापले की त्यांनी मोदींना खरं खोटं सुनावलं. ते बोलले की, 'आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, ते पुर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने सर्वात मोठं योगदान दिलं ते म्हणजे जवाहरलाल नेहरु. अशा कुटुंबाबद्दल तुम्ही इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलता आणि तेदेखील आंबेडकरांच्या आठवणीत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्धाटनावेळी. मला वाटतं हा माणूस एकदम नीच आहे. त्याच्यात कोणती सभ्यता नाही. अशावेळी इतक्या घाणेरड्या राजकारणाची काय गरज'.

Web Title: 'Even if you are of low caste, your work has been made big', Narendra Modi's turn to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.