इंजिनिअर ते एमबीए... कुंभमेळ्यात तब्बल 10 हजार पदवीधारक बनले नागासाधू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:04 PM2019-02-04T15:04:57+5:302019-02-04T15:07:26+5:30

प्रयागराजमध्ये 29 वर्षीय शंभू गिरी नागा साधूची दिक्षा घेण्याच्या वाटेवर निघाला आहे. त्याने युक्रेनमधून मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे.

Engineer to MBA ... In the Kumbh Mela, 10 thousand graduates have become Nagasadhu | इंजिनिअर ते एमबीए... कुंभमेळ्यात तब्बल 10 हजार पदवीधारक बनले नागासाधू

इंजिनिअर ते एमबीए... कुंभमेळ्यात तब्बल 10 हजार पदवीधारक बनले नागासाधू

googlenewsNext

प्रयागराज - उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा सध्या अंतिम टप्प्यात आहे. कुंभमेळ्याच्या या अंतिम टप्प्यात तब्बल 10 हजार जणांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. विशेष म्हणजे दीक्षा घेणारांमध्ये इंजिनिअर ते एमबीए पदवीधारकांचा समावेश आहे. सनातन धर्मांमध्ये नागा साधू बनणे तपस्यातील सर्वात कठीण विधींपैकी एक आहे. तरीही अनेक पदवीधरांनी नागा साधू बनण्याची दीक्षा घेतली आहे.  

प्रयागराजमध्ये 29 वर्षीय शंभू गिरी नागा साधूची दिक्षा घेण्याच्या वाटेवर निघाला आहे. त्याने युक्रेनमधून मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे. उज्जैनमधील बारावीचा टॉपर असलेल्या घनश्याम गिरीचीही ही कथा आहे. या सर्वांनी मोह-माया टाळून नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. तर मरीन इंजिनिअर असलेल्या 27 वर्षीय रजत कुमारनेही मरिन लाईनमध्ये मिळणारे मोठ्या पगाराचे पॅकेज सोडून चक्क नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. या तीन पदवीधारकांप्रमाणेच तब्बल 10 हजार जणांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे. त्यासाठी केस अर्पण हा विधीही त्यांनी पूर्ण केला. रात्रभर जागून ओम नम: शिवायचा जपही या तरुणांनी केला आहे. 

सहा वर्षांनी बनता येतं नागा साधू

नागा साधू बनण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात. त्यासाठी तब्बल सहा वर्षानंतर नागा साधू बनता येते. तर नवीन सदस्याला फक्त लंगोटशिवाय कोणतेही वस्त्र परिधान करण्यास मनाई आहे. कुंभ मेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर नागा साधूमधील नवे सदस्य त्यांच्या लंगोटचे त्याग करु शकतात. नागा साधू फक्त दिवसातून एकवेळ जेवण करु शकतात. त्याचप्रमाणे सात घरे फिरुन भिक्षा मागावी लागते. जर भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशी राहावे लागते. फक्त जमिनीवर झोपून नागा साधूंना त्यांचे संपूर्ण आयुष्य पार पाडायचे असते.

Web Title: Engineer to MBA ... In the Kumbh Mela, 10 thousand graduates have become Nagasadhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.