जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 12:39 PM2019-05-31T12:39:28+5:302019-05-31T12:40:52+5:30

शोधमोहिम सुरु असताना सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला.

encounter of two terrorists in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

googlenewsNext

शोपियान : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्याच्या द्रागड सुगान भागात सकाळी दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरु होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून अद्याप चकमक सुरु आहे. 


शोधमोहिम सुरु असताना सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरातील कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे वृत्त होते. अद्यापही कारवाई सुरु आहे. 




रमजानचा महिना सुरु असल्याने दहशतवाद्यांनी तसेच लष्करानेही कारवाया करू नयेत असे आवाहन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले होते. 




 

Web Title: encounter of two terrorists in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.