Lok Sabha Election 2019: भाजपा वापरणार 2014 चाच 'जबरदस्त फंडा'; पुण्यात ठरला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 10:02 AM2018-07-12T10:02:36+5:302018-07-12T11:59:24+5:30

लक्षात ठेवा आपले सरकार योग्य असते आणि विरोधी सरकार कुचकामी, अपयशी असते - शहा यांनी टीमवर बिंबवले.

Election 2014: BJP will use 2014 'tremendous fund'; 'Plan' in Pune | Lok Sabha Election 2019: भाजपा वापरणार 2014 चाच 'जबरदस्त फंडा'; पुण्यात ठरला 'प्लॅन'

Lok Sabha Election 2019: भाजपा वापरणार 2014 चाच 'जबरदस्त फंडा'; पुण्यात ठरला 'प्लॅन'

googlenewsNext

मुंबई - 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा मतदारांना आकर्षित करण्यासाठी 2014चाच फंडा वापरणार आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या आठवड्यात भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात भाजपच्या सोशल मिडिया स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही सुचना दिल्या. 

2019 च्या निवडणूकीतमध्ये देशात दोन कोटी नवीन तरूण मतदार असल्याचे बोलले जात आहे.  भाजपाने पूर्ण लक्ष या नवीन मतदारांवर केंद्रीत केले आहे. या पूर्ण प्लॅनमध्ये भाजपाची सोशल मीडियाची टीम जोरदार काम करत आहे.  

असा आहे अमित शाह यांचा प्लॅन 

  1. सोशल मीडिया टीमसाठी भाजपचा त्रिसूत्री कार्यक्रम.
  2. सोशल मीडियाच्या तीन टीम करणार.
  3. पहिली टीम प्रिंट मीडियातील सरकार किंवा भाजप विरोधातील बातम्यांवर लक्ष ठेवणार.
  4. दुसरी टीम निवडणूकीदरम्यान येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवणार.
  5. तिसरी टीम  क्रिएटिव्हिटी आणि कार्टून च्या माध्यमातून पक्ष विरोधी बातम्यांना प्रत्युत्तर देणार.
  6. प्रत्येक बुथमध्ये अराजकीय पाच व्यक्ती शोधणार.
  7. भाजप आणि सरकार विरोधी बातम्यांचे खंडन करणारे बुलेटिन दररोज सकाळी सर्वसामान्या व्यक्तींना पाठवणार.
  8. अमित शहा याना अपेक्षा आहे की भाजपचे बुलेटिन अन्य मित्रांना, समूहात फॉरवर्ड करतील.
  9. 2014 च्या निवडणुकीत सोशल मीडियाने महत्वाची भूमिका बजावली होती. 
  10. हेच सूत्र वापरून विरोधी पक्षाला नामोहरम करायचे - शहा यांचा कानमंत्र. 
  11. लक्षात ठेवा आपले सरकार योग्य असते आणि विरोधी सरकार कुचकामी, अपयशी असते - शहा यांनी टीमवर बिंबवले.

Web Title: Election 2014: BJP will use 2014 'tremendous fund'; 'Plan' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.