मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन करू नका - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 01:04 PM2017-08-24T13:04:15+5:302017-08-24T13:08:36+5:30

मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जन करू नये आणि हिंदू व मुस्लीमांनी सौहार्दाचं वातावरण ठेवावं असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे

do not immerse Durga on Muharram says Mamata Banerjee | मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन करू नका - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आवाहन

मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन करू नका - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आवाहन

Next
ठळक मुद्देया वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुहर्रम येत आहे. याच दिवशी दुर्गा विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे दुर्गा विसर्जन या दिवशी न करण्याचं आवाहन बॅनर्जी यांनी केलं आहे. एकमेकांना सहकार्य करा आणि सौहार्दाचं वातावरण राखा असं त्यांनी म्हटलं आहे.

कोलकाता, दि. 24 - मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जन करू नये आणि हिंदू व मुस्लीमांनी सौहार्दाचं वातावरण ठेवावं असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. या वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुहर्रम येत आहे. याच दिवशी दुर्गा विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे दोन्ही मिरवणुका समोरासमोर आल्या तर तणावाचं वातावरण होऊ शकतं, अनुचित प्रकार घडू शकतात, त्यामुळे दुर्गा विसर्जन या दिवशी न करण्याचं आवाहन बॅनर्जी यांनी केलं आहे. एकमेकांना सहकार्य करा आणि सौहार्दाचं वातावरण राखा असं त्यांनी म्हटलं आहे. 
धार्मिक तेढ निर्माण व्हावी यासाठी काही घटक लोकांना भडकवतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली असून त्याचा राजकीय फायदाही उठवला जाईल अशी शक्यता बॅनर्जी यांनी उपस्थित केली. दुर्गा पूजा समित्यांची त्यांनी बौठक बोलावली होती, यावेळी त्यांनी ही मते व्यक्त केली आहेत. काही जण राजकीय लाभ पदरात पाडण्यासाठी झटत आहेत, अशावेळी आपण कशाला अंगावर बालंट घ्यायचं असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बॅनर्जी यांनी पोलीस अधिक्षकांना राज्यभरात जिल्हा पातळीवरील दुर्गा समित्यांशी व मुहर्रम समित्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. एक ऑक्टोबर रोजी मुहर्रम आहे आणि त्याचदिवशी पारपंरिकरीत्या दुर्गा विसर्जनाचा दिवस यंदा येत आहे. रेड रोड कार्निवल 3 ऑक्टोबर रोजी करण्याचे व दुर्गा विसर्जनासाठी 4 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्याचे त्यांनी सांगितले.
समाजात तेढ वाढेल अशा सोशल मीडियातील पोस्टना बली पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

Web Title: do not immerse Durga on Muharram says Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.