Diya Mirza's election as UN ambassador to UN | संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण दूत म्हणून दिया मिर्झाची निवड

नवी दिल्ली :  'रहना है तेरे दिल में' फेम अभिनेत्री दिया मिर्झाची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँचेट, ऐनी हॅथवे, एंजेलिना जोली, कॅटी पेरी आणि एमा वॉटसन ह्या देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण दूत म्हणून काम करत आहेत. भारतातील वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाची देखील दिया ब्रँड अॅबेसिडर आहे.  भारतात पर्यावरण आणि वन्य प्राण्यासांठी दिया मिर्जा काम करते.

संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण दूत म्हणून निवड केल्यानंतर 35 वर्षीय दिया मिर्जानं आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, पर्यावरण संरक्षण आणि चिरंतन विकासाला चालना देण्यासाठी मला संयुक्त राष्ट्रसंघासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची आणि मला प्रेरणा देणारी गोष्ट आहे. सध्याच्या काळतील पर्यावरणाच्या वाढत्या समस्या हे एक आव्हान आहे. आपण पर्यावरणाचे संरक्षण एकत्र मिळून करू, या कामात सहभाग होण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करेन’ असेही दीया म्हणाली. 


दिल्लीतील वायू प्रदुषणामुळे नारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या भारताला पर्यावरणाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  पर्यावरण संवर्धनासाठी, पर्यावरण जागृतीसाठी आणि निरोगी भविष्याकरता दिया काम करेल, असे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण क्षेत्राचे प्रमुख ईरीक सोलेहीम म्हणाले.

दिया मिर्झाशिवाय बॉलिवूडमधील पाच अभिनेत्रीही संयुक्त राष्ट्रसंघासोबत काम करत आहेत. यामध्ये एश्वर्या राय-बच्चन, प्रिंयका चोप्रा, शबाना आजमी, लारा दत्ता, आणि मनिषा कोइराला यांचा समावेश आहे. या पाचही वेगवेगळ्या विभागाच्या ब्रँड अॅबेसिडर आहेत.