अतिरेक्यांचे समर्थन बंद केल्यास पाकशी चर्चा, जनरल बिपिन रावत यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:21 AM2017-12-23T01:21:54+5:302017-12-23T01:22:40+5:30

जम्मू -काश्मिरात अतिरेक्यांना मदत करणे पाकिस्तान जेव्हा बंद करेल तेव्हाच शांतता चर्चा होईल, असे स्पष्टीकरण लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहे. बाडमेरजवळ सैन्याच्या युद्धसरावादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

 Discussion with Pakistan, General Bipin Rawat's explanation, if the withdrawal of terrorists support | अतिरेक्यांचे समर्थन बंद केल्यास पाकशी चर्चा, जनरल बिपिन रावत यांचे स्पष्टीकरण

अतिरेक्यांचे समर्थन बंद केल्यास पाकशी चर्चा, जनरल बिपिन रावत यांचे स्पष्टीकरण

Next

जयपूर : जम्मू -काश्मिरात अतिरेक्यांना मदत करणे पाकिस्तान जेव्हा बंद करेल तेव्हाच शांतता चर्चा होईल, असे स्पष्टीकरण लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहे. बाडमेरजवळ सैन्याच्या युद्धसरावादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
रावत म्हणाले की, आमचीही इच्छा आहे की, पाकिस्तानशी संबंध चांगले असावेत. पण, जम्मू -काश्मिरात दहशतवादाला ज्याप्रकारे पाककडून समर्थन देण्यात येते त्यावरुन असे वाटते की, पाकिस्तानला शांतता नको आहे. त्यामुळे पाकिस्तानने अगोदर दहशतवादाचे समर्थन करणे बंद करावे.
भारत - पाकिस्तान सीमेच्या पश्चिमी क्षेत्रात थारच्या वाळवंटात सैन्यदल आणि हवाई दलाचा संयुक्त युद्धसराव ‘हमेशा विजयी’ सुरु आहे. याची पाहणी करण्यासाठी ते येथे आले होते. जम्मू- काश्मिरात अतिरेक्यांविरुद्ध सैन्य, निमलष्करी दल आणि जम्मू - काश्मीर पोलीस यशस्वीपणे सातत्याने कारवाई करत आहेत आणि ही कारवाई सुरुच राहील. (वृत्तसंस्था)
परराष्ट्र खात्याचीही तीच भूमिका
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केले होते की, पाकिस्तानने अतिरेकी गटांविरुद्ध कारवाई केल्यास भारत आणि पाकिस्ताानातील संबंध चांगले होऊ शकतात. अगोदर पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरुन कारवाया करणाºया अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करावी. त्यानंतर रावत यांनी हे विधान केले आहे हे विशेष.

Web Title:  Discussion with Pakistan, General Bipin Rawat's explanation, if the withdrawal of terrorists support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.