डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांची फोनवरून चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:50 AM2019-01-09T06:50:34+5:302019-01-09T06:50:55+5:30

व्यापारी तूट भरून काढण्यावर भर

Discussion by Donald Trump and Narendra Modi on phone | डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांची फोनवरून चर्चा

डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांची फोनवरून चर्चा

Next

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी फोनवरून चर्चा झाली. व्यापारी तूट भरून काढणे व अफगाणिस्तानातील सहकार्यात वाढ हे दोन नेत्यांमधील चर्चेचे मुद्दे होते, असे व्हाइट हाउसने म्हटले आहे.

अमेरिकेच्या भारताबरोबरील व्यापारात सध्या तूट आहे, ती भरून काढण्यासाठी काय करता येईल, यावर दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाली. भारतातून आयात होणारे स्टील व अ‍ॅल्युमिनियमवर अमेरिकेत ट्रम्प प्रशासन आयात शुल्क आकारत आहे. त्याचा भारताच्या व्यापारावरही परिणाम होत आहे. त्यावरही दोघांत चर्चा झाली. अमेरिकेमध्ये रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी ट्रम्प यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला.

Web Title: Discussion by Donald Trump and Narendra Modi on phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.