Different lanes for e-vehicles | ई-वाहनांसाठी वेगळी लेन

संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व महामार्गांवर आगामी काळात ई-वाहनांसाठी वेगळी लेन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उपयोग केवळ ई-वाहनच करू शकतील व यासाठी वेगळ्या खुणा केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर हे काम हाती घेतले जाईल. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, येणाºया काळासाठी आतापासूनच पावले उचलण्याची गरज आहे. महामार्गांवर वेगळ्या ई-वाहन लेन तयार करणे, हा त्याचा एक मोठा भाग आहे.
अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लेन बनवताना काही विशिष्ट अंतरावर चार्जिंग स्टेशन विकसित करण्यात येणार आहेत. येथे चार्जिंग करण्यासाठी आॅनलाईन कार्ड पेमेंटची व्यवस्था असेल. याबरोबरच जे वाहनधारक नियमित महामार्गांचा वापर करीत असतील त्यांच्यासाठी प्रीपेड ई-चार्जिंग कार्डचीही सुविधा देण्याचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर हा खुणांचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. कारण या मार्गावर खूप वाहतूक असते. त्यामुळेच येथे ही योजना यशस्वी होण्याची अपेक्षा जास्त आहे. सध्याच्या नियोजनानुसार, पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत निवडक मार्गांवर ही सुविधा देण्यात येईल.
>ई-वाहनचा फायदा
एका अधिकाºयाने सांगितले की, अशा ई-लेनमध्ये सोलार पॅनल लावले जातील व त्याद्वारेही चार्जिंग करण्याची सुविधा
करून दिली जाईल. ई-वाहन उपयोगात आणणाºयांना कसल्याही प्रकारचा टोल टॅक्स देण्याची गरज पडणार नाही.