सोनिया आणि राहुल गांधींना तुरुंगात का टाकत नाही?; काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 04:06 PM2019-06-24T16:06:46+5:302019-06-24T16:07:23+5:30

देशात सगळीकडे पाणीसंकट आहे आणि बिहारमध्ये चमकी तापामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र तुम्हाला काहीच फरक पडत नाही.

Did you manage to send Sonia Gandhi & Rahul Gandhi behind the bars? Ask Congress leader to Narendra Modi | सोनिया आणि राहुल गांधींना तुरुंगात का टाकत नाही?; काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल

सोनिया आणि राहुल गांधींना तुरुंगात का टाकत नाही?; काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल

Next

नवी दिल्ली- लोकसभेत सध्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना काँग्रेसचे संसदीय नेते अधीर रंजन चौधरी यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला केला. यावेळी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी विविध मुद्द्यावरुन भाजपाला टीकेचे लक्ष्य केले. 

पंतप्रधान मोदी मोठे विक्रेते
कोळसा आणि 2 जी घोटाळ्यामध्ये तुमचं सरकार येऊन सहा वर्ष झाली तरी आजतागायत कोणालाही पकडता आलं नाही. आजपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी जेलच्या बाहेर कसे? त्यांना तुरुंगात का टाकत नाही? देशाचा कायदा मजबूत व्हावा आणि दोषींवर कडक कारवाई अशी आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे विक्रेते आहेत. आम्ही आमचे प्रोडक्ट विकण्यास असमर्थ ठरलो तर दुसरीकडे भाजपाने त्यांच्याकडील खराब प्रोडक्टही चांगल्यारितीने विकण्यास यशस्वी ठरली. 

विवेकानंद यांच्याशी पंतप्रधानांची तुलना चुकीची 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात सरकारच्या धोरणांची झलक दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त तुमचे नाहीत तर आपल्या सर्वांचे आहेत. स्वामी विवेकानंद यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली तुलना चुकीची आहे. फक्त नरेंद्र नाव असल्याने समानता करु शकत नाही. मॉँ गंगा आणि खराब नाल्याची तुलना करु शकत नाही. यावरुन संसदेत गदारोळ निर्माण झाला. 

देशात पाणीसंकट आणि बिहारमध्ये बालमृत्यू त्याचं काहीच देणंघेणं नाही
देशात सगळीकडे पाणीसंकट आहे आणि बिहारमध्ये चमकी तापामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र तुम्हाला काहीच फरक पडत नाही. नवीन खासदारांना विश्वास आहे की, आपल्याला काही करण्याची गरज नाही फक्त मोदी बाबावर विश्वास ठेवा ते सगळं करतील. मोदी नावाची पूजा केल्याने सर्व समस्या सुटतील असा विचार नव्या खासदारांचा आहे. 2008-09 मध्ये आर्थिक मंदी असतानाही देशाची जीडीपी दर 8 टक्क्यांहून जास्त होता. 

काँग्रेसचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न 
देशात परमाणू संशोधनाचा पाया नेहरुंच्या कार्यकाळात होमी भाभा यांच्या माध्यमातून रचला गेला. परमाणू परीक्षणासाठी आम्ही वाजपेयींचे कौतुक करतो तसेच रस्ते निर्माणातही त्यांचे योगदान आहे. जर तुम्ही आमच्या नेत्यांची नावं घेत नसाल तर तुमच्या सरकारवर आमचा विश्वास कसा असेल? पहिल्यांदा परमाणू देश आम्हाला वंचित मानत असे मात्र 2008 मध्ये आम्ही संसदेत परमाणू करार पारित केला. पंतप्रधान ज्या देशात जातील त्याठिकाणी त्यांचा सन्मान झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. मात्र देशाला मिसाइल सिस्टम काँग्रेसने दिलं त्याच्या बळावर आज तुम्ही पाकिस्तानला संपविण्याची भाषा करता हे विसरु नका 

जर काँग्रेसने देशात स्पेस आणि मिसाइल मिशनची सुरुवात केली नसती तर आज चांद्रयान अंतरिक्षमध्ये पाठविण्याचा विचार करु शकला असता का? देशात टेलिकॉम क्रांती आणण्याचं काम काँग्रेसच्या कार्यकाळात झालं. जेव्हा टेलिकॉम क्रांतीची चर्चा होते तेव्हा राजीव गांधी यांचे नाव समोर येतं. जर राजीव गांधी नसते तर देशात टेलिकॉम क्षेत्र मजबूत झालं असतं का? असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधानांना केला. तसेच आता 5 जी चं युग आलं आहे. देशाच्या लोकांनी ही सुविधा मिळायला हवी. मनरेगा, आरटीआय, आरटीई, जमीन अधिग्रहण, खाद्य सुरक्षा असे महत्वाचे कायदे आणण्याचं काम काँग्रेसने केले. 

भाजपाची भूमिका दुटप्पीपणाची 
मोदींनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेसच्या योजनांचे नाव बदलण्याचं काम फक्त केलं. बेरोजगारीच्या समस्येवर सरकारने अधिक लक्ष देणं गरजेचे आहे. पाकिस्तानविरोधात मजबूत नीती बनविणे गरजेचे आहे. एकीकडे तुमच्या पक्षाचे लोक गोडसेच्या बाजूने नारे देतात तर दुसरीकडे तुम्ही महात्मा गांधी जयंती साजरी करता असा टोला अधीर रंजन चौधरींनी मोदींना लगावला.


Web Title: Did you manage to send Sonia Gandhi & Rahul Gandhi behind the bars? Ask Congress leader to Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.