नोटबंदी : 'त्या' 2 लाख लोकांना आयकर विभागाची नोटीस , द्यावा लागणार हिशेब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 05:23 PM2018-02-19T17:23:55+5:302018-02-19T17:30:57+5:30

आयकर विभागाने 2 लाख खातेदारांना नोटीस पाठवली आहे, ज्या लोकांनी नोटबंदीनंतर आपल्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा केली...

Demonetisation impact IT issues notice to 2 lakh account holders | नोटबंदी : 'त्या' 2 लाख लोकांना आयकर विभागाची नोटीस , द्यावा लागणार हिशेब

नोटबंदी : 'त्या' 2 लाख लोकांना आयकर विभागाची नोटीस , द्यावा लागणार हिशेब

googlenewsNext

नवी दिल्ली : आयकर विभागाने जवळपास 2 लाख खातेदारांना नोटीस पाठवली आहे. ज्या लोकांनी आपल्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा केली व आयकर परतावाही ( इन्कम टॅक्स रिटर्न ) भरला नाही अशा लोकांना आम्ही नोटीस पाठवली आहे असं अर्थ मंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिका-याने सांगितलं. 

ज्या लोकांनी नोटबंदीनंतर आपल्या अकाउंटमध्ये 20 लाखांहून जास्त रक्कम जमा केली आणि आयकर परतावाही ( इन्कम टॅक्स रिटर्न ) भरला नाही अशा खातेदारांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. money.bhaskar.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.
29 टक्क्यांनी संख्या वाढली - 
अर्थ मंत्रालयानुसार, नोटबंदीमुळे आयकर परतावा भरणा-यांच्या संख्येत मोठी वाढ झाली.  2016-17 मध्ये आयकर परतावा भरणा-यांची संख्या 8.55 कोटी झाली. इकोनॉमिकच्या सर्व्हेनुसार 2015-16+मध्ये एकूण टॅक्स भरणा-यांची संख्या 5.93 कोटी होती.  
1.10 कोटी बॅंक खात्यांमध्ये जमा झाले 2 लाखांहून जास्त रूपये -
सरकारी आकडेवारीनुसार, नोटबंदीच्या काळात 1.10 कोटी बॅंक अकाउंटमध्ये 2 लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. नोटबंदीनंतर जास्त रक्कम जमा करणा-या 18 लाख लोकांना गेल्या वर्षी 2017 मध्ये आयकर विभागाने नोटीस पाठवून पैशांच्या व्यवहाराबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. 10 दिवसांमध्ये उत्तर देण्यास त्यांना सांगण्यात आलं होतं. 
काय आहे ITR चे नियम - 
-सध्याच्या नियमानुसार वर्षाला 2.5 लाखांपेक्षा जास्त कमाई असणा-यांसाठी आयकर परतावा भरणं आवश्यक आहे.

-जर कोणी परतावा भरत नसेल तर आयकर विभागाकडून त्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवलं जाऊ शकतं. तसंच आय़कर विभाग दंडाची आकारणीही करू शकतं किंवा अशा व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला कमाल 2 वर्षांची शिक्षाही होऊ शकते.

-जर एखाद्या करदात्याने 25 लाख रूपयांपेक्षा जास्त करचोरी केल्याचं सिद्ध झाल्यास अशा व्यक्तीला जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.   

Web Title: Demonetisation impact IT issues notice to 2 lakh account holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.