हिथ्रोला मागे टाकणार दिल्ली विमानतळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:24 AM2018-11-01T04:24:33+5:302018-11-01T04:25:35+5:30

वाशांची वाढती संख्या लक्षात घेत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची (आयजीआय) क्षमता वाढविण्याची तयारी सुरूआहे.

Delhi airport to overtake Heathrow | हिथ्रोला मागे टाकणार दिल्ली विमानतळ

हिथ्रोला मागे टाकणार दिल्ली विमानतळ

googlenewsNext

नवी दिल्ली : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची (आयजीआय) क्षमता वाढविण्याची तयारी सुरूआहे. पुढील ३ वर्षांमध्ये याची तयारी केली जाईल. त्यानंतर दरवर्षी १० कोटी प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे.

दिल्ली इंटरनॅशनल एयरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड तथा ‘डायल’ने याबाबत काम सुरू केले आहे. सध्या या विमानतळाची क्षमता ६ ते ७ कोटी असून ‘डायल’ आगामी ३ वर्षांमध्ये ९ हजार कोटींची गुंतवणूक करेल. २०२० पर्यंत या विमानतळाचा वापर करणाऱ्यांची संख्या ८ कोटींपर्यंत पोहोचेल. क्षमता वाढल्यास ‘आयजीआय’ लंडनच्या हिथ्रो विमानतळास मागे टाकण्याची शक्यता आहे. डायल कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, ३७ महिन्यांमध्ये खूप मोठी क्षमता असलेला विमानतळ उभारणे अशक्य होते.

Web Title: Delhi airport to overtake Heathrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.