धक्कादायक ! गतिमंद मुलीवर बलात्कार, आईला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ मिळाल्यानंतर FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 01:43 PM2018-04-18T13:43:46+5:302018-04-18T13:43:46+5:30

एका 12 वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

Delhi 12 year girl raped, mother got To know through whats app video | धक्कादायक ! गतिमंद मुलीवर बलात्कार, आईला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ मिळाल्यानंतर FIR दाखल

धक्कादायक ! गतिमंद मुलीवर बलात्कार, आईला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ मिळाल्यानंतर FIR दाखल

Next

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील रोहिणी नगर येथे एका 12 वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक व गंभीर बाब म्हणजे मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडीओ व्हॉट्स अॅपवर मिळाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तीन जणांपैकी एक जण मुलीच्या शेजारी राहणारा व्यक्ती आहे. ही घटना सोमवारी (16एप्रिल)रात्री घडली आहे. घटनेचा कथित व्हिडीओ रोहिणीतील मंगोलपूर कला परिसरात बनवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंटी नावाच्या एक तरुणानं पीडित मुलीची फसवणूक करुन तिला स्थानिक समुदाय केंद्रामध्ये बोलावले व तेथून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बंटीच्या दोन साथीदारांनी याचा व्हिडीओ बनवला. पोलिसांच्या माहितीनुसार, बंटीनं बलात्कारानंतर पीडित मुलीला धमकी दिली होती. घडल्या प्रकाराबाबत जर कोणालाही सांगितले तर याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी बंटीनं पीडितेला दिली. त्याच्या धमकीला घाबरुन पीडित मुलीनं कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला व तिच्या आईला व्हॉट्सअॅपवर हा व्हिडीओ मिळाला.

यानंतर पीडितेच्या आईनं तातडीनं पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, यासाठी आरोपींकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.  
 

Web Title: Delhi 12 year girl raped, mother got To know through whats app video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.