तिहेरी तलाकबंदी विधेयक आज येणार राज्यसभेत , भाजपाची घाई, समितीकडे पाठवण्याचा विरोधकांचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 1:42am

तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे व अशा तलाक पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक केंद्र सरकार उद्या, बुधवारी राज्यसभेमध्ये मांडणार आहे. या विधेयकासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या सूचनांकडे केंद्र सरकारने कानाडोळा केला आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली - तिहेरी तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे व अशा तलाक पद्धतीवर बंदी घालणारे विधेयक केंद्र सरकार उद्या, बुधवारी राज्यसभेमध्ये मांडणार आहे. या विधेयकासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या सूचनांकडे केंद्र सरकारने कानाडोळा केला आहे. मुस्लीम महिलांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत विलंब व्हावा असे काही लोकांचे प्रयत्न सुरू असले तरी ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. तिहेरी तोंडी तलाकवर बंदी घालणारे विधेयक मंगळवारी नव्हे, तर बुधवारी राज्यसभेत मांडले जाईल हे वृत्त सर्वात प्रथम ‘लोकमत’ने दिले होते. राज्यसभेमध्ये विद्यमान स्थितीत विरोधी पक्षांचे बहुमत आहे. हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर व्हावे असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, तर या विधेयकातील काही तरतुदींच्या पुनर्विचारासाठी ते चिकित्सा समितीकडे पाठवावे, अशी विरोधकांनी मागणी केली आहे. यासंदर्भात एका केंद्रीय मंत्र्याने लोकमतला सांगितले की, राज्यसभेमध्ये भाजपाचे बहुमत नसेलही; परंतु मुस्लीम महिलांना न्याय देण्याच्या मुद्द्यावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळे तलाकबंदी विधेयक राज्यसभेत उद्या मांडण्यात येणार असून त्याचे भवितव्य सभागृहानेच ठरवावे अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. तिहेरी तलाकबंदी विधेयक गेल्या आठवड्यात लोकसभेने संमत केले होते. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर करणे आवश्यक आहे. पण राज्यसभेत भाजपाला बहुमत नसल्याने या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. या विधेयकातील तरतुदींवर विविध राजकीय पक्षांचे एकमत व्हावे, म्हणून भाजपाने प्रयत्नही चालविले आहेत. मात्र या विधेयकातील काही तरतुदींच्या विरोधात काँग्रेस, डावे पक्ष, अण्णाद्रमुक, द्रमुक यांनी ठाम विरोधाची भूमिका घेतलेली आहे. चिकित्सा समितीकडे गेल्यास लांबणीवर हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविले गेल्यास ती आपला अहवाल फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देईल. मात्र हे विधेयक इतक्या लांबणीवर टाकण्याची भाजपाची आणि केंद्र सरकारची तयारी नाही. हे विधेयक लवकरात लवकर मंजूर व्हावे, हे भाजपाला राजकीयदृष्ट़्या गरजेचे वाटत आहे.

संबंधित

तिहेरी तलाक पद्धती हद्दपार करा : शायरा बानो; पुण्यात ‘तिहेरी तलाक नाट्य की असंतोष’
ओम प्रकाश रावत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
मुंडन करून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध
माघी गणोशोत्सव डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या पथ्यावर, विरोधीपक्षनेत्यांकडून अधिका-यांची खरडपट्टी
वर्धा दूरदर्शन केंद्राचे प्रक्षेपण जानेवारीअखेर बंद

राष्ट्रीय कडून आणखी

विमानात वायफायची सुविधा दिल्यास विमान कंपन्या तिकिटाच्या 30 टक्के दर आकारणार
पद्मावत : सुप्रीम कोर्टानं राज्यांना फटकारत फेटाळल्या याचिका, देशभरात झळकणार सिनेमा
महिला टॉयलेटमध्ये गेल्यानंतर तो मोबाइल कॅमे-याने करायचा शूट, सॉफ्टवेअर कंपनीतील धक्कादायक प्रकार
धक्कादायक! नव-याच्या डोक्यावर बंदूक रोखून महामार्गावर विवाहित महिलेवर बलात्कार, गाडीतून खेचून बाहेर काढले
Video : काँग्रेसकडून भाजपाचा 'बीफ जनता पार्टी' म्हणून उल्लेख, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वीच वातावरण तापलं

आणखी वाचा