काँग्रेसशी चर्चा करूनच घेऊ निर्णय; मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच - मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:08 AM2018-05-29T05:08:48+5:302018-05-29T05:08:48+5:30

विधानसभा निवडणुकीच्या आम्ही जनादेश मागितला होता, पण जनतेने तो न दिल्याने आमचे सरकार काँग्रेसवर अवलंबून आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला

Decision to discuss with Congress; Cabinet expansion too soon - Chief Minister H. D. Coomaraswamy | काँग्रेसशी चर्चा करूनच घेऊ निर्णय; मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच - मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी

काँग्रेसशी चर्चा करूनच घेऊ निर्णय; मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच - मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी

Next

बंगळुरू : विधानसभा निवडणुकीच्या आम्ही जनादेश मागितला होता, पण जनतेने तो न दिल्याने आमचे सरकार काँग्रेसवर अवलंबून आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. अर्थात, आमच्या पक्षाने जाहीरनाम्यात दिलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा आपण नक्कीच अंमलात आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘राज्यात केवळ माझ्या पक्षाचे सरकार नाही. जनता दलाला स्पष्ट बहुमत मिळावे, असे आमचे
आवाहन होते. तसे घडले नाही. त्यामुळे आज मी काँग्रेसच्या कृपेवर अवलंबून आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावाखाली नाही,’ असेही त्यांनी नमूद केले. स्पष्टीकरण कुमारस्वामी यांनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले. त्या आधी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास माझे प्राधान्य असेल. शेतकºयांना कर्जमाफी देण्यास अयशस्वी ठरलो, तर
मी पदाचा राजीनामा देईन. आता आमचे सरकार काँग्रेस व जनता
दलाचे मिळून आले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करूनच सारे निर्णय होणे स्वाभाविक आहे, पण त्यामुळे शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत मी ठाम आहे. त्यांच्याशी चर्चा करून आठवडाभरात तो निर्णय घेतला जाईल.
कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री व काँग्रेसचे जी. परमेश्वर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली आणि त्यांनी बहुमत सिद्ध केले असले, तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र झालेला नाही. काँग्रेसमध्ये मंत्रिपदाचे अनेक नेते इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ठरवतील, तेच मंत्री होतील. हा निर्णय राहुल गांधी पुढील आठवड्यात परदेशातून परत येणार असून, त्यानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राजघाटावर पुष्पांजली
नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुमारस्वामी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज दिल्लीत भेटले. त्यानंतर, त्यांनी दुपारी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधीस्थळावर जाऊन तिथे पुष्पांजली वाहिली.

शेतकºयांची कर्जमाफीचे आश्वासन पाळण्यात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या कथित अपयशाबाबत भाजपाने पुकारलेल्या बंदला सोमवारी अल्प प्रतिसाद मिळाला. शाळा, कॉलेज, सार्वजनिक परिवहन सेवा सुरू होती.
बहुतांश शेतकरी, कन्नड समर्थक संस्थांनी या बंदला समर्थन दिलेले नाही. म्हैसूरमध्ये आंदोलन करणारे भाजपाचे खासदार प्रताप सिम्हा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Decision to discuss with Congress; Cabinet expansion too soon - Chief Minister H. D. Coomaraswamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.