दगडफेकीत पर्यटकाचा मृत्यू; काश्मीरची स्थिती चिघळली, अनेक भागांत निर्बंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:44 AM2018-05-09T01:44:56+5:302018-05-09T01:44:56+5:30

शोपियांमध्ये रविवारच्या चकमकीत ठार झालेले पाच दहशतवादी व सुरक्षा दलांच्या गोळीबारात स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू यांमुळे श्रीनगर व आसपासच्या शहरांत वातावरण अधिकच चिघळू लागले आहे. जवानांच्या गोळीबारातील आणखी एका जखमीचे मंगळवारी निधन झाल्याने तणाव वाढला असून, जवळपास संपूर्ण खोऱ्यात पोलिसांनी अनेक निर्बंध जारी केले आहे.

Death of a tourist; Kashmir situation worsened, restrictions apply in many parts | दगडफेकीत पर्यटकाचा मृत्यू; काश्मीरची स्थिती चिघळली, अनेक भागांत निर्बंध लागू

दगडफेकीत पर्यटकाचा मृत्यू; काश्मीरची स्थिती चिघळली, अनेक भागांत निर्बंध लागू

Next

श्रीनगर - शोपियांमध्ये रविवारच्या चकमकीत ठार झालेले पाच दहशतवादी व सुरक्षा दलांच्या गोळीबारात स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू यांमुळे श्रीनगर व आसपासच्या शहरांत वातावरण अधिकच चिघळू लागले आहे. जवानांच्या गोळीबारातील आणखी एका जखमीचे मंगळवारी निधन झाल्याने तणाव वाढला असून, जवळपास संपूर्ण खोऱ्यात पोलिसांनी अनेक निर्बंध जारी केले आहे.
स्थानिक तरुणांच्या दगडफेकीत एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याने तेथील दुकानदार, हॉटेल व्यावसायिकही घाबरून गेले आहेत. पर्यटन संस्था व पर्यटकांतही भीती आहे. उन्हाळ्यात लाखो पर्यटक काश्मीरमध्ये जातात. अशा वेळीच वातावरण बिघडवून टाकण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या दगडफेकीमागेही अतिरेकी गट आहे की काय, अशी शंका घेतली जात आहे.
बडगाममध्ये पर्यटकांच्या वाहनावर दगडफेक झाली. त्यात तामिळनाडूचा एक पर्यटक मरण पावला. दोघे जखमी झाले. या घटनेचा मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी निषेध केला. मुफ्ती यांनी रुग्णालयात मृत पर्यटकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि जखमींची चौकशी केली. पर्यटकांवर दगडफेक करणारे काश्मीरचे समर्थक नव्हेत, तर गुंड आहेत, अशी टीका त्यांनी केली.
फुटीरवादी नेते मिरवाइज उमर फारुख, सय्यद शाह अली गिलानी व यासिन मलिक यांनीही दगडफेकीचा निषेध केला आहे. पर्यटकांशी असे वागणे ही काश्मिरींची संस्कृती नाही, असे फारुख यांनी म्हटले आहे.
हिंसाचाराच्या घटनांना पीडीपी व भाजपाची अभद्र युती कारणीभूत आहे. त्यामुळे तुम्ही भाजपाची साथ सोडून द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी मुख्यमंत्री मुफ्ती यांना केले
आहे. (वृत्तसंस्था)

जमावबंदी, इंटरनेट सेवा स्थगित

रविवारच्या चकमकीनंतर जवानांच्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झालाच होता. आज आणखी एक जण मरण पावला. त्यामुळे मृतांची संख्या ६ झाल्याने पुन्हा खोºयामध्ये तणाव वाढला आहे. तिथे रविवारपासून निर्बंध लागू आहेत. सात पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात जमावबंदी लागू असून, इंटरनेट सेवाही बंदही आहे.

Web Title: Death of a tourist; Kashmir situation worsened, restrictions apply in many parts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.