लखनौ : गोरखपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आॅक्सिजनअभावी मुलांचा झालेला मृत्यू ही दुर्घटना नसून, हत्याकांड आहे अशा शब्दांत नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
कैलाश सत्यार्थी यांनी ७० वर्षांचे हेच स्वातंत्र्य आमच्या मुलांसाठी आहे काय? असा सवाल ट्विटद्वारे केला आहे. ते म्हणाले, भ्रष्ट आरोग्य व्यवस्थेला सुधारण्यासाठी हस्तक्षेप गरजेचा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आॅक्सिन तुटवड्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले आहे.
आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी ९ आॅगस्टला हॉस्पिटलचा दौरा केला होता. पण, त्यांना समस्या सांगण्यात आल्या नाहीत. आम्ही हॉस्पिटलला जाऊन परिस्थिती पाहणार आहोत.

मेंदूला सूज : आॅक्सिजनच्या कमतरतेने मेंदूला सूज येते आणि त्यात मृत्यू ओढावू शकतो. मुलांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, डॉक्टर योग्य उपचार करत नव्हते. उपचारासाठी आवश्यक औषधीही येथे नव्हती. स्थानिक लोकांनी सांगितले की, या हॉस्पिटलमध्ये मोफत औषधे मिळत नाहीत. आवश्यक आरोग्य सुविधा नाहीत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.