Dangerous: Rape for a 65-year-old from a 15-year-old child | धक्कादायकः 15 वर्षांच्या मुलाकडून 65 वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार

नवी दिल्ली- 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 65 वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. सोमवारी दुपारी दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. आरोपी अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पीडित महिला इतरांच्या घरी घरकाम करून स्वतःचा उदरनिर्वाह करते. सोमवारी काम करून घरी परल्यानंतर हा प्रसंग घडल्याचं पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे.  या मुलाचे वडील एके ठिकाणी केअरटेकर म्हणून काम करतात. तसंच जिथे ही घटना घडली त्या मोकळ्या जागेच्या शेजारच्या भागातच हा मुलगा राहतो असंही पीडित महिलेने सांगितलं. 

पीडित महिला आंघोळ करत असताना हा मुलगा तिथे आला. त्याने तिच्यावर बळजबरी केली. तसंच पोलिसांना किंवा कोणालाही काही सांगितले तर तुला नुकसान पोहचवलं जाईल, अशीही धमकी आरोपीने दिली. पण त्यानंतरही मानसिक धक्का बसलेल्या या महिलेने नेब सराई पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या सगळ्या प्रकाराचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं आहे. पीडित वृद्धेचा कबुली जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची छत्तीसगढ येथील असून गेल्या काही वर्षांपासून ती दिल्लीत राहते आहे. सध्या एका एनजीओकडून त्याचं समुपदेशन केलं जातं आहे