देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो- हार्दिक पटेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 04:27 AM2018-10-28T04:27:33+5:302018-10-28T06:39:26+5:30

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला.

The country runs on the constitution, not on the demand of religion - Hardik Patel | देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो- हार्दिक पटेल 

देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो- हार्दिक पटेल 

Next

अलिबाग : देश धर्माच्या विचारावर नाही, तर संविधानावर चालतो. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना वेळीच हिसका दाखवला पाहिजे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून भाजपा राज्य करत आहे. आता बहुजनांनी पेटून उठण्याची गरज आहे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारवर केला.

संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या अधिवेशनाचे सुप शनिवारी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात वाजले त्याप्रसंगी पटेल बोलत होते.
संभाजी ब्रिगेड ही सामाजिक विचारांची अशी चळवळ आहे, जी राजकारणाला कलाटणी देऊ शकते. यासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापसात न भांडता आपला शत्रू कोण आहे, हे ओळखून रयतेचे राज्य आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्यावर प्रकाश टाकल्याने त्यांच्याविरोधात कारस्थान केल्याचे आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट करून वर्मा यांना क्लीन चिट दिली, तर आस्थाना यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
देशाचा खरा इतिहास बदलणाºयांना संभाजी ब्रिगेडने रोखण्याचे काम केले आहे. त्यामुळे इतिहास आणि संविधान बदलण्याची भाषा करणाºयांना आता रोखण्याची गरज असल्याचे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. भगवा आणि तिरंगा वापरण्याची परवानगी कोणलाही देण्यात येऊ नये. झेंड्याच्या नावावर राज्य जिंकणाºयांना छत्रपतींचा विसर पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अभिजन विरुद्ध बहुजन असा लढा उभा राहिला आहे. एकजुटीने ही लढाई लढण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. या प्रसंगी आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, सुधीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The country runs on the constitution, not on the demand of religion - Hardik Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.