cordon and search operation by army crpf and police underways in pulwama district of jammu kashmir | Jammu Kashmir: पुलवामात सर्च ऑपरेशन सुरू; 20 गावांमध्ये दहशतवादी लपल्याची शक्यता
Jammu Kashmir: पुलवामात सर्च ऑपरेशन सुरू; 20 गावांमध्ये दहशतवादी लपल्याची शक्यता

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लष्करानं शोध मोहीम सुरू केली आहे. पुलवामातील गावांमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे सीआरपीएफ, लष्कर आणि राज्य पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली आहे. पुलवामातील 20 गावांमध्ये दहशतवादी लपून बसल्याचं वृत्त आहे. 

दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी सक्रीय आहेत. याच भागात काल (रविवारी) लष्कराकडून दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात आली होती. तर एक सप्टेंबरला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला होता. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. तर हाजिनमध्ये गेल्या गुरुवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकीच्या एक दिवस आघीच शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका पथकावर हल्ला केला होता. यामध्ये चार पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. 
 


Web Title: cordon and search operation by army crpf and police underways in pulwama district of jammu kashmir
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.