'चौकीदार चोर है' : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राहुल गांधींनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 04:13 PM2019-04-30T16:13:22+5:302019-04-30T16:20:02+5:30

'चौकीदार चोर है' असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन केल्या प्रकरणी अखेर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे.

Contempt case against Rahul Gandhi matter : Rahul Gandhi apologized in Supreme Court | 'चौकीदार चोर है' : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राहुल गांधींनी मागितली माफी

'चौकीदार चोर है' : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राहुल गांधींनी मागितली माफी

googlenewsNext

नवी दिल्ली -'चौकीदार चोर है' असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन केल्या प्रकरणी अखेर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे. राफेल विमान करार प्रकरणात फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राफेल विमान करारप्रकरणात 'चौकीदार चोर है' ही बाब सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केली आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्याविरोधात भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. 

राहुल गांधींविरोधात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी राहुल गांधी यांच्या दिलगिरी व्यक्त करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शपथपत्रात विरोधाभासी उल्लेख कसे काय आहेत? तसेच दिलगिरी व्यक्त करण्यासाठी 22 पानांचे शपथपत्र सादर करावे लागते का? अशी विचारणा केली. त्यानंतर राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या अशिलाच्या वतीने माफी मागितली. चौकीदार चोर है, हे वाक्य मी मी सर्वोच्च न्यायालाच्या न्यायमूर्तीच्या निर्णयाशी चुकीच्या पद्धतीने जोडले. ही माझी चुक आहे, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल गांधींच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.  आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे. 





राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात येणाऱ्या विषयांवर ओघात आपण 'चौकीदार चोर है' असे शब्द प्रयोग केले, मात्र ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला दिले होते. मात्र या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफीच मागितली पाहिजे अशी मागणी मीनाक्षी लेखी यांच्या वकीलांनी केली होती.  



 

Web Title: Contempt case against Rahul Gandhi matter : Rahul Gandhi apologized in Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.