काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 05:57 AM2019-07-02T05:57:44+5:302019-07-02T05:58:23+5:30

अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली.

Congress's five chief ministers resign? | काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत?

काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत?

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सोमवारी गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. परंतु राहुल गांधी यांनी आपला निश्चय सोडण्याचे कोणतेही संकेत त्यांना दिले नाहीत, असे सूत्रांकडून समजते.
अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला तुम्ही जबाबदार नसून, भाजपने धर्म आणि लष्कर यांचा प्रचारात वापर करून मतदारांची दिशाभूल केली आणि मतदार त्यास बळी पडले, असे या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. भाजपने खोट्या गोष्टी मतदारांच्या मनावर बिंबविल्याचेही या मुख्यमंत्र्यांनी राहुल यांना सांगितले.
पक्षाच्या पाचही मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची भाषा केल्याने
राहुल गांधीही अस्वस्थ झाले. मात्र तुम्ही राजीनामा यांंनी त्यांना सांगितले. त्यांनी पंजाब सरकारचे अभिनंदनही केले. त्यावर आमच्या राज्यातील पराभव झाल्याने आम्हीही राजीनामा देतो, असे अन्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्रकारांना गेहलोत म्हणाले, आमची दोन तास अगदी मनमोकळी चर्चा झाली. आम्ही आमची मते व पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाध्यक्षांना कळविल्या. त्यांनीही आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पक्षाच्या हितासाठी ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे.

आमचा फक्त प्रस्ताव
तुम्ही व कलम नाथ यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली हे खरे का, असे विचारता गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्री राजीनामा देण्याचा फक्त प्रस्ताव करू शकतात. त्यावर निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.

Web Title: Congress's five chief ministers resign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.