ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - 2019 साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर देशात अच्छे दिन येतील असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी समाचार घेतला आहे. 2019 विसराच 2090 मध्येही कॉंग्रेस सत्तेत येणार नाही असं म्हणत नायडूंनी कॉंग्रेसला डिवचलं आहे.   
 
2019 साली कॉंग्रेस सत्तेत येईल हा राहुल गांधींचा दावा ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र, 2019 सोडा 2090 मध्येही काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही, असं नायडू म्हणाले.
 
2019 साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर देशाला अच्छे दिन येतील असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी बुधवारी जनवेदना मेळाव्यात बोलताना म्हणाले होते. राहुल गांधींनी जनवेदना मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर चौफेर हल्ला चढवला. आम्ही 70 वर्ष संस्थांचा आदर केला, मोदी आणि आरएसएसने अडीच वर्षात सर्वकाही बदलून टाकले. भाजपा, आरएसएस आणि नरेंद्र मोदींनी मिळून आरबीआय सारख्या संस्थेला कमजोर केले असा आरोप राहुल यांनी केला.  
नोटाबंदीच्या निर्णयानंतर गाडयांची विक्री 60 टक्क्यांनी कमी झाली आपण 16 वर्ष मागे गेलो. पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यस्थेचा कणा मोडला असे आरोप राहुल यांनी केली. मोदी आणि मोहन भागवतांनी एका फटक्यात लोकांचे घामाचे पैसे, कागदामध्ये बदलले  असे राहुल म्हणाले.