राहुल गांधी-चंद्राबाबूंचे हातात हात, एकत्र लढणार भाजपाच्या विरोधात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:12 PM2018-11-01T17:12:29+5:302018-11-01T17:24:17+5:30

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीसाठी करण्यात येत असलेल्या मोर्चेबांधणीला आज मोठे यश मिळाले आहे.

Congress & TDP announce Alliance for save democracy | राहुल गांधी-चंद्राबाबूंचे हातात हात, एकत्र लढणार भाजपाच्या विरोधात!

राहुल गांधी-चंद्राबाबूंचे हातात हात, एकत्र लढणार भाजपाच्या विरोधात!

Next

नवी दिल्ली -  2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीसाठी करण्यात येत असलेल्या मोर्चेबांधणीला आज मोठे यश मिळाले आहे. देश आणि देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. 





तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपाविरोधात व्यापक आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्ऩशील आहेत. दरम्यान,  नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाच्या युतीची घोषणा केली. 



 

Web Title: Congress & TDP announce Alliance for save democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.