मेघालयात काँग्रेसला झटका, चार आमदारांचा भाजपात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत on Tue, January 02, 2018 4:04pm

मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसच्या चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

शिलॉंग : मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसच्या चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्याआधीच कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन पक्षासमोर नवे संकट उभे केले होते. विशेष म्हणजे या पाच आमदारांमध्ये माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांचा समावेश आहे. दरम्यान, मेघालय भाजपाचे अध्यक्ष शिबून लिंगदोह आणि भाजपाचे सरचिटणीस (ईशान्य भारताचे प्रभारी) राम माधव  यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी कॅबिनेट मंत्री ए. एल. हेक मंगळवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. तसेच, हेक यांच्यासोबत आणखी तीन आमदार पक्षात अधिकृतपणे सामील होणार आहेत, असे मेघालय भाजपाचे अध्यक्ष शिबून लिंगदोह यांनी आधीच सांगितले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात सत्ताधारी काँग्रेसमधील पाच आमदारांसह आठ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

 

संबंधित

मोदी सरकार सुरुवातीपासून अपयशी
युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा
बेरोजगार व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
युवक काँग्रेसच्या निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
भाजप-सेनेने दाेन्ही पक्षांचा मुख्यमंत्री करावा- रामदास अाठवले

राष्ट्रीय कडून आणखी

बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह 6 जणांना आजन्म तुरुंगवास 
अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याचा विचार
जुलैपासून एकाच पद्धतीचे वाहन परवाने
#Metoo आरोप निखालस खोटे, हा बदनामीचा ‘अजेंडा’ - एम. जे. अकबर
शाहजहांपूरमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

आणखी वाचा