मेघालयात काँग्रेसला झटका, चार आमदारांचा भाजपात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 04:04 PM2018-01-02T16:04:02+5:302018-01-02T16:07:42+5:30

मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसच्या चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

Congress sweeps in Meghalaya, four MLAs enter BJP | मेघालयात काँग्रेसला झटका, चार आमदारांचा भाजपात प्रवेश 

मेघालयात काँग्रेसला झटका, चार आमदारांचा भाजपात प्रवेश 

googlenewsNext
ठळक मुद्देमेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग कॉंग्रेसच्या चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेशशिबून लिंगदोह आणि राम माधव यांच्या उपस्थितीत आमदारांचा प्रवेश

शिलॉंग : मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. कॉंग्रेसच्या चार आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपामध्ये प्रवेश करण्याआधीच कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन पक्षासमोर नवे संकट उभे केले होते. विशेष म्हणजे या पाच आमदारांमध्ये माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांचा समावेश आहे. दरम्यान, मेघालय भाजपाचे अध्यक्ष शिबून लिंगदोह आणि भाजपाचे सरचिटणीस (ईशान्य भारताचे प्रभारी) राम माधव  यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 




काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी कॅबिनेट मंत्री ए. एल. हेक मंगळवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. तसेच, हेक यांच्यासोबत आणखी तीन आमदार पक्षात अधिकृतपणे सामील होणार आहेत, असे मेघालय भाजपाचे अध्यक्ष शिबून लिंगदोह यांनी आधीच सांगितले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात सत्ताधारी काँग्रेसमधील पाच आमदारांसह आठ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.





 

Web Title: Congress sweeps in Meghalaya, four MLAs enter BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.