भविष्यात गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होईल- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 06:19 PM2018-03-10T18:19:51+5:302018-03-10T18:19:51+5:30

भविष्यात नेहरू किंवा गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकते, असे सूचक विधान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले.

Congress May Be Headed By Someone Outside Family In Future: Sonia Gandhi | भविष्यात गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होईल- सोनिया गांधी

भविष्यात गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होईल- सोनिया गांधी

Next

नवी दिल्ली: भविष्यात नेहरू किंवा गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकते, असे सूचक विधान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. त्यासाठी सोनिया यांनी मनमोहन सिंग यांचे उदाहरण दिले. 2004 मध्ये पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली. कारण या पदासाठी ते माझ्यापेक्षा अधिक योग्य होते, असे सोनियांनी म्हटले. 

काँग्रेस पक्षाला एक मोठी परंपरा आहे. या परंपरेनुसार संघटनेतील नेत्यांची निवड लोकशाही पद्धतीने केली जाते. यावेळी त्यांनी राजकीय घराणेशाहीबद्दल बोलताना अमेरिकेतील बुश आणि क्लिंटन परिवाराचा उल्लेख दिला. तसेच भारतामधीलही काही राज्यांतील घराणेशाहीच्या इतिहासाचा दाखला दिला. यावेळी सोनिया यांनी यूपीएच्या काळात मनमोहन सिंग यांना कोणतेही अधिकार नव्हते, या विधानाचे खंडन केले. मनमोहन सिंग पंतप्रधान असूनही त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, अशी चर्चा होते. मात्र, तशी परस्थिती कधीच नव्हती, हे सोनियांनी स्पष्ट केले. 

मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेस अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्गक्रण करत होती. अनेकांनी काँग्रेसची साथ सोडली होती. मात्र, मी पक्षासाठी काहीच केले नाही तर तो भ्याडपणा ठरेल, या विचाराने मी राजकारणात प्रवेश केल्याचे सोनियांनी सांगितले. 
 

Web Title: Congress May Be Headed By Someone Outside Family In Future: Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.