स्मारकाला दिला रंग, आत ठेवल्या मूर्ती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:50 AM2018-05-05T02:50:20+5:302018-05-05T02:50:20+5:30

मोहम्मद तुघलकच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेले दिल्लीतील स्मारकाचे शिव मंदिर करण्यात आले आहे. काही मंडळींनी ठरवून दोन महिन्यांपूर्वी या स्मारकाचे शिव मंदिरात रूपांतर केले. या वास्तूला सरकारने स्मारकाचा दर्जा दिला असताना, ते तुघलकाच्या काळातील असल्यानेच त्याचे मंदिरात रूपांतर केल्याचे दिसत आहे.

 The color given to the monument, the idol placed inside it | स्मारकाला दिला रंग, आत ठेवल्या मूर्ती  

स्मारकाला दिला रंग, आत ठेवल्या मूर्ती  

Next

नवी दिल्ली - मोहम्मद तुघलकच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेले दिल्लीतील स्मारकाचे शिव मंदिर करण्यात आले आहे. काही मंडळींनी ठरवून दोन महिन्यांपूर्वी या स्मारकाचे शिव मंदिरात रूपांतर केले. या वास्तूला सरकारने स्मारकाचा दर्जा दिला असताना, ते तुघलकाच्या काळातील असल्यानेच त्याचे मंदिरात रूपांतर केल्याचे दिसत आहे. ते स्मारक पांढऱ्या व भगव्या रंगाने रंगवून आतमध्ये शंकराची मूर्तीही ठेवण्यात आली आहे.

ऐतिहासिक स्मारकामध्ये रंगकाम, दुरुस्ती वा बदल करता येत नाही. असे असताना हे सारे कोणी केले, याची माहिती दिल्ली सरकारलाही नाही. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आता त्या शिव मंदिरापाशी दोन बाकडी बसवण्यात आली असून, त्यावर स्थानिक भाजपा नगरसेविकेचे नाव आहे. मात्र स्मारकात बदल कोणी केला, हे आपणास माहीत नाही, असे त्या म्हणाल्या.

Web Title:  The color given to the monument, the idol placed inside it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.