वैमानिक पती-पत्नीमध्ये विमानातच जुंपली! जेट एअरवेजचं विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 11:20pm

विमानातून प्रवास करताय आणि अचानक वैमानिकांमध्ये भांडण झालं, असं चित्र कधी तुम्ही पाहिलंय काय ? नाही ना, अशीच एक घटना लंडनहून मुंबईला येणा-या विमानात घडली आहे.

नवी दिल्ली- विमानातून प्रवास करताय आणि अचानक वैमानिकांमध्ये भांडण झालं, असं चित्र कधी तुम्ही पाहिलंय काय ? नाही ना, अशीच एक घटना लंडनहून मुंबईला येणा-या विमानात घडली आहे. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी लंडनहून मुंबईच्या दिशेनं एक विमान येत होतं. या विमानात प्रवासी नव्हे, तर चक्क पती-पत्नी वैमानिकच आपापसात भिडले आहेत. विशेष म्हणजे या वैमानिकांच्या भांडणात विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे. 1 जानेवारी 2018 रोजी ही घटना घडली आहे. ज्यावेळी वा-याच्या वेगानं विमान उड्डाण करत होते, त्यावेळी या पती-पत्नी असलेल्या वैमानिकांमध्ये कॉकपिटमध्ये भांडण झालं. या विमानात 324 प्रवासी होते. त्यातील काही प्रवासी हे झोपले होते, तर काही जागे होते. जेट एअरवेजचं विमान 9डब्लू119 हे लंडनहून उड्डाण करून मुंबईत येत असतानाच या नवरा-बायकोंमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर महिला वैमानिक पाणावलेल्या डोळ्यांनी कॉकपिटच्या बाहेर येऊन रडू लागली. त्यामुळे केबिन क्रू मेंबर्सही आश्चर्यचकीत झाले. महिला वैमानिकाला अचानक का रडू कोसळलं, या प्रश्नानं सर्वच अवाक् झाले.   त्यानंतर सगळीकडे चर्चा झाल्यानंतर वैमानिक असलेल्या पती-पत्नींमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं. त्या महिला वैमानिक पत्नीनं पहिल्यांदा पतीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्याच जोरजोरात कडाक्याचं भांडण झालं. परंतु त्या दोघांमध्ये भांडण झालं, त्यावेळी विमान हवेत होतं. या प्रकारानंतर DGCAनं महिला वैमानिकाचा परवाना रद्द केला आहे. तसेच या दोघांनाही कामावरून तात्पुरतं निलंबित केलं असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

संबंधित

'त्या' टॅक्सीने संसदेबाहेर उडवला गोंधळ; सुरक्षारक्षकांची झाली पळापळ
वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात
'यूपी-बिहारवाले नोकऱ्या बळकावतात'
अब की बार सुपरफास्ट कारभार; अवघ्या 24 तासांत काँग्रेस सरकारांचे 10 मोठे निर्णय
मोबाईल नंबर, बँक खात्यासाठी आधार सक्ती नाही; दोन कायद्यांमध्ये सुधारणा होणार

राष्ट्रीय कडून आणखी

'त्या' टॅक्सीने संसदेबाहेर उडवला गोंधळ; सुरक्षारक्षकांची झाली पळापळ
वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात
'यूपी-बिहारवाले नोकऱ्या बळकावतात'
अब की बार सुपरफास्ट कारभार; अवघ्या 24 तासांत काँग्रेस सरकारांचे 10 मोठे निर्णय
मोबाईल नंबर, बँक खात्यासाठी आधार सक्ती नाही; दोन कायद्यांमध्ये सुधारणा होणार

आणखी वाचा