भारतातील या शहरामध्ये 'देवा'साठी चक्क एअरपोर्ट करतात बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 07:34 PM2017-10-27T19:34:07+5:302017-10-27T19:52:07+5:30

जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते?

In this city of India many airports are closed for 'God' | भारतातील या शहरामध्ये 'देवा'साठी चक्क एअरपोर्ट करतात बंद

भारतातील या शहरामध्ये 'देवा'साठी चक्क एअरपोर्ट करतात बंद

Next

तिरुअनंतपुरम - जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते? हे ऐकायला कदाचीत विचित्र वाटत असेल पण असं दक्षिण भारतातील केरळमध्ये होतं. येथे स्वामी पद्मनाभ स्वामी मंदिर यात्रेसाठी धावपट्टीला बंद केलं जातं. 

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कदाचीत अशाप्रकारचं जगातील एकमेव विमानतळ असण्याची शक्यता आहे. या विमानतळाची धावपट्टी सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या सोहळ्यासाठी गेल्या काही दशकांपासून वर्षातून दोन वेळेस बंद केली जाते. याशिवाय विमानांच्या उड्डाणांची वेळही बदलली जाते. 

स्वामी पद्मनाभ मंदिराच्या 10 दिवसीय 'पैनकुनी' आणि 'अलपस्सी' उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिरातील मुर्त्यांची यात्रा काढण्याच्यावेळी विमानांच्या उड्डाणांना 5 तासांसाठी थांबवलं जातं. याबाबतची सुचना  विमानतळाकडून अधिका-यांना एक आठवडा आधीच दिली जाते. 
विमानतळ परिसराजवळील शनगुमुगम बीचजवळ सीआयएसएफचे शस्त्रधारी जवान संपूर्ण यात्रेदरम्यान धावपट्टीच्या दोन्ही बाजूला तैनात असतात, यात्रेनंतर मूर्त्यांना पुन्हा त्याच रस्त्याने आणलं जातं. उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत उड्डाणं थांबवली जातात. या पाच तासांमध्ये विमानतळ परिसरातून केवळ स्पेशल पास असलेल्या लोकांनाच जाण्याची परवानगी दिली जाते. कोणाला पास द्यायचा याची यादीही मंदिराकडूनच पाठवली जाते.  

वर्ष 1932 मध्ये या विमानतळाचं बांधकाम पूर्ण झालं होतं, पण या मंदिराची ही परंपरा याआधीपासून सुरू आहे.  

Web Title: In this city of India many airports are closed for 'God'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.