संपकरी कर्मचा-यांऐवजी आमदारांच्या वेतनात वाढ, खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:35 AM2018-01-11T00:35:43+5:302018-01-11T00:36:08+5:30

तामिळनाडूमधील वाहतूक कर्मचा-यांच्या संपाला सात दिवस झाले असून, त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल होत आहे. हा संप मिटावा म्हणून कोणत्याही हालचाली न करता तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी आपले स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न चालवले असून, त्यासाठी आमदारांचे मासिक वेतन व भत्ते दुपटीने वाढविण्यासाठीचे विधेयक विधानसभेत मांडले आहे.

The Chief Minister tried to save the seats, increase the wages of legislators, instead of the employees | संपकरी कर्मचा-यांऐवजी आमदारांच्या वेतनात वाढ, खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील

संपकरी कर्मचा-यांऐवजी आमदारांच्या वेतनात वाढ, खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील

googlenewsNext

चेन्नई : तामिळनाडूमधील वाहतूक कर्मचा-यांच्या संपाला सात दिवस झाले असून, त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल होत आहे. हा संप मिटावा म्हणून कोणत्याही हालचाली न करता तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी आपले स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न चालवले असून, त्यासाठी आमदारांचे मासिक वेतन व भत्ते दुपटीने वाढविण्यासाठीचे विधेयक विधानसभेत मांडले आहे.
द्रमुकप्रणित लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशनचे नेते व सरचिटणीस एम. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली या कर्मचाºयांनी कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. विविध वाहतूक महामंडळ कार्यालयांसमोरही निदर्शने करण्यात आली. तामिळनाडू सरकारने या कर्मचाºयांना देऊ केलेली वेतनवाढ कामगार संघटनांनी नाकारली आहे हंगामी चालक व वाहकांद्वारे ही बससेवा सुरू ठेवण्याचा सरकारने प्रयत्न केला पण ते प्रयत्न तोकडे पडले.

Web Title: The Chief Minister tried to save the seats, increase the wages of legislators, instead of the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Chennaiचेन्नई