सरन्यायाधीश गोगोई सुनावणीतून अलिप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:09 AM2019-01-22T06:09:54+5:302019-01-22T06:10:04+5:30

‘सीबीआय’च्या हंगामी संचालकपदी एम. नागेश्वर राव यांच्या नेमणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीतून अलिप्त राहण्याचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी सोमवारी जाहीर केले.

Chief Justice Gogoi detracts from hearing | सरन्यायाधीश गोगोई सुनावणीतून अलिप्त

सरन्यायाधीश गोगोई सुनावणीतून अलिप्त

Next

नवी दिल्ली: ‘सीबीआय’च्या हंगामी संचालकपदी एम. नागेश्वर राव यांच्या नेमणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीतून अलिप्त राहण्याचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी सोमवारी जाहीर केले.
‘कॉमन कॉज’ ही स्वयंसेवी संस्था व माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी केलेल्या या याचिका कामकाजाच्या वाटपानुसार सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आल्या; मात्र सीबीआयचे नवे संचालक निवडणाºया समितीमध्येही आपण सदस्य असल्याने या याचिकांवरील सुनावणी आपण करणार नाही, असे न्या. गोगोई यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मल्लिकार्जुन खरगे व सरन्यायाधीश न्या. गोगोई यांचा समावेश असलेल्या निवड समितीची सीबीआयचे नवे संचालक निवडण्यासाठी येत्या गुरुवारी बैठक व्हायची आहे.

Web Title: Chief Justice Gogoi detracts from hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.