कुख्यात डॉन छोटा शकीलचा मुलगा बनला मौलाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:03 PM2018-08-27T13:03:06+5:302018-08-27T13:03:38+5:30

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जवळील हस्तक छोटा शकीलच्या मुलानं अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे.

Chhota Shakeel’s son Mubashir Shaikh adopts spiritual path in Pakistan | कुख्यात डॉन छोटा शकीलचा मुलगा बनला मौलाना

कुख्यात डॉन छोटा शकीलचा मुलगा बनला मौलाना

Next

मुंबई - कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जवळील हस्तक छोटा शकीलच्या मुलानं अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. पाकिस्तानातील कराची येथे तो 'हाफिज-ए-कुराण' बनला आहे. छोटा शकीलचा सर्वात लहान मुलगा मुबश्शिर शेखनं काही दिवसांपूर्वी 'हाफिज-ए-कुराण' म्हणजे मौलाना बनून खळबळ उडवली आहे. वर्षभरापूर्वी दाऊदच्या मुलानंही अध्यात्माचा मार्ग अवलंबला होता. ज्याला संपूर्ण कुराण तोंडपाठ असते, त्यांना 'हाफिज-ए-कुराण' असे म्हटले जाते. कुराणमध्ये 6,236 आयतांचा समावेश आहे. मुबश्शिरनं आता कराचीतील आसपास परिसरात कुराणचा प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. मुबश्शिर येथे आपले वडील छोटा शकीलसोबत वास्तव्यास आहे. छोटा शकीलला डी कंपनीचा कर्ताधर्ता मानलं जाते.   

दरम्यान, मौलाना मोईन यांच्यापासून प्रेरित झालेला मुबश्शिर आता डोक्यावर टोपी व हातात माळ घेत लोकांमध्ये कुराणबाबत प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. मौलाना मोईन म्हणजे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा होय. मोईनप्रमाणे मुबश्शिरनंही आपल्या वडिलांच्या गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांनी भरलेल्या जगाचा स्वीकार केलेला नाही. यामुळे डॉन इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांनी उभारलेल्या गुन्हेगारीच्या साम्राजाचा वारसदार कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
  

 

Web Title: Chhota Shakeel’s son Mubashir Shaikh adopts spiritual path in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.