छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:32 AM2019-04-05T08:32:28+5:302019-04-05T10:00:39+5:30

छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी (5 एप्रिल) पहाटे चकमक झाली आहे. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत.

chhattisgarh naxals encounter security forces dhamtari crpf | छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद

छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद

Next
ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी (5 एप्रिल) पहाटे चकमक झाली आहे.चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. छत्तीसगडमधील धमतरी परिसरात ही चकमक झाली. 

रायपूर - छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी (5 एप्रिल) पहाटे चकमक झाली आहे. या चकमकीत सीआरपीएफचा  एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील सालेघाट जंगलात ही चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

गुरुवारी (4 एप्रिल) छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत बीएसएफच्या चार जवानांना वीरमरण आले. तर अन्य दोन जवान जखमी झाले होते. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांकेरमधील प्रतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महला गाव येथे बीएसएफच्या 114 व्या बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. दरम्यान, जखमी जवानांना पखांजूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांकडून आपल्या प्रभावक्षेत्रातील नागरिकांना सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत. त्यासाठी नक्षलवाद्यांकडून पत्रके वाटण्यात येत आहेत, तसेच बॅनरबाजी होत आहे. त्याबरोबरच नक्षलवादी या भागात सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करत आहेत. 



कांकेरमधील पखांजूर येथेही नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. नक्षलवादविरोधी ऑपरेशनचे डीआयजी सुंदराज यांनी याली दुजोरा दिला आहे. दरम्यान सुंदराज यांनी नक्षवाद्यांसोबतच्या चकमकीत चार जवानांना वीरमरण आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर शुक्रवारी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत.  

छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (26 मार्च) चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. बिमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली होती. कोबरा 201 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला होता. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. नक्षलवाद्यांकडून 1 रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या. गोळीबार थांबल्यानंतरही जवानांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं होतं.  

 

Web Title: chhattisgarh naxals encounter security forces dhamtari crpf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.