Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 07:52 AM2018-12-11T07:52:22+5:302018-12-11T14:30:18+5:30

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018: काँग्रेस आणि भाजपामध्ये सत्तेसाठी आरपारची लढाई पाहायला मिळणार

Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर | Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर

Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर

Next

रायपूर- छत्तीसगडमध्ये गेल्या अनेक काळापासून भाजपाकडे सत्ता आहे. राज्यातील 90 जागांवर निवडणूक झाली असून, आज मतमोजणी होत आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला 49 तर काँग्रेसला 39 जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा काँग्रेस आणि भाजपामध्ये सत्तेसाठी आरपारची लढाई पाहायला मिळणार आहे. छत्तीसगड विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018चा कल हाती येणार आहेत. त्यातील 20 जागा या छत्तीसगडमध्ये सरकार बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सरगुजा, बिलासपूर, दुर्ग आणि रायपूर भागातील 16 आणि बस्तरमधील 4 जागांवरचे निकाल सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरणार आहेत. यंदा भाजपाच्या नेत्यांचा विजय कठीण दिसत असला तरी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात वातावरण नाही. त्यामुळे रमण सिंह यांच्या प्रतिमेच्या जोरावर भाजपा सत्ता संपादन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसनं दिलेले उमेदवार हे मजबूत स्थितीत आहेत. तसेच काही जागांवर मायावती-अजित जोगी यांच्या पक्षांची आघाडी वरचष्मा राखण्याची शक्यता आहे. 

गेल्या दोन निवडणुकांमधली छत्तीसगडची स्थिती ग्राफिक्सच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. 

LIVE

Get Latest Updates

03:15 PM

सुकमामध्ये चिंतागुफा येथे IEDच्या स्फोट, निवडणुकीदरम्यान तैनात असलेला जवान जखमी



 

02:15 PM

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष...90 पैकी 60 पेक्षा जास्त जागांवर आघाडी


 

01:31 PM

रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर, माजी मुख्यमंत्री अजित जोगींची मोठ्या विजयाकडे वाटचाल

11:57 AM

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र, काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर, तर भाजपा 19 जागांवर पुढे

11:02 AM

छत्तीसगडमधल्या नक्षल प्रभावित भाग असलेल्या बस्तर जिल्ह्यात काँग्रेसचं चांगलं प्रदर्शन, 12 पैकी 11 जागांवर आघाडी

10:46 AM

छत्तीसगडमध्ये काँग्रेस 57 जागांवर आघाडीवर, तर भाजपा 26 जागांवर पुढे

10:18 AM

छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताच्या समीप, 90 जागांपैकी 75 जागांचे जवळपास कल हाती, 46 जागांवर काँग्रेस आघाडीवर, भाजपा 26 जागांवर पुढे

10:13 AM

मारवाही मतदारसंघातून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी तिसऱ्या स्थानी



 

10:04 AM

राजनांदगाव मतदारसंघातून रमण सिंह काँग्रेसच्या उमेदवाराला पछाडत 3700 मतांनी पुढे

09:42 AM

राजनांदगावमधून मुख्यमंत्री रमण सिंह पिछाडीवर



 

09:20 AM

काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, तर भाजपाला 20 जागांवर पुढे
 

09:17 AM

राजनांदगाव रमण सिंह पिछाडीवर, काँग्रेस उमेदवार करुणा शुक्ला आघाडीवर

09:08 AM

छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस भाजपापेक्षा पुढे, काँग्रेस 23 जागांवर पुढे, तर भाजपाला 15 जागांवर आघाडी

09:07 AM

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर, काँग्रेस 16 जागा, तर भाजपा 15 जागांवर आघाडीवर
 

09:04 AM

छत्तीसगडमध्ये भाजपा 10 जागांवर आघाडीवर

Web Title: Chhattisgarh Assembly Election Results Live: काँग्रेसला 60 जागांवर आघाडी, रमण सिंग सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.