उपेंद्र कुशवाह यांना बिहारमधील महाआघाडीत आणण्यात छगन भुजबळ यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 09:08 PM2018-12-20T21:08:47+5:302018-12-20T21:11:45+5:30

उपेंद्र कुशवाह यांना यूपीएच्या गोटाध्ये आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. 

Chhagan Bhujbal played an important role in bringing the Upendra Kushwaha in the UPA | उपेंद्र कुशवाह यांना बिहारमधील महाआघाडीत आणण्यात छगन भुजबळ यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

उपेंद्र कुशवाह यांना बिहारमधील महाआघाडीत आणण्यात छगन भुजबळ यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी देणारे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा हे आज काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएमध्ये दाखल झालेउपेंद्र कुशवाह यांना यूपीएच्या गोटामध्ये आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहेअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सदन येथे बिहारमधील आगामी निवडणुकीसंदर्भात आज बैठक संपन्न झाली

नवी दिल्ली -  भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी देणारे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा हे आज काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएमध्ये दाखल झाले. दरम्यान, उपेंद्र कुशवाह यांना यूपीएच्या गोटामध्ये आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. 

 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सदन येथे बिहारमधील आगामी निवडणुकीसंदर्भात आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह,लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल इत्यादी नेते हजर होते. या बैठकीमध्ये बिहारमधील आगामी निवडणुकीबाबत चर्चा होऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात समविचारी पक्षांचे महागटबंधन करण्याचा निर्णय झाला. महागटबंधनबाबत निर्णय  आणि निवडणुकीची दिशा ठरवल्यानंतर एआयसीसी मध्ये जाऊन महागटबंधन जाहीर करण्यात आले.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.

Web Title: Chhagan Bhujbal played an important role in bringing the Upendra Kushwaha in the UPA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.