धक्कादायक! डीएमके नेत्याकडून महिलेला लाथांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 03:43 PM2018-09-13T15:43:27+5:302018-09-13T15:44:15+5:30

या नेत्याने चक्क एका महिलेला लाथांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.   

chennai dmk leader selavakumar seen thrashing a woman arrested | धक्कादायक! डीएमके नेत्याकडून महिलेला लाथांनी मारहाण

धक्कादायक! डीएमके नेत्याकडून महिलेला लाथांनी मारहाण

Next

चेन्नई : सत्तेची नशा आणि पैशाच्या धुंदीत असलेल्या नेत्यांच्या करामती तुम्ही बऱ्याचदा व्हिडीओच्या माध्यमातून पाहिल्या असतीलच. अशीच नशा असलेल्या एका नेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या नेत्याने चक्क एका महिलेला लाथांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.   

तामिळनाडूमधील एम.के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या डीएमके पक्षाचा हा नेता आहे. सेल्वाकुमार असे या नेत्याचे नाव असून तो डीएमकेचा माजी नगरसेवक होता. येथील पेरंबलुरमधील ब्युटी सलूनमध्ये सेल्काकुमार एका महिलेला लाथांनी मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना चार महिन्यापूर्वी घडली आहे.    


दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता समोर आल्यानंतर सेल्वाकुमारला पोलिसांनी अटक केली आहे. याचबरोबर, सेल्वाकुमारची डीएमके पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. 
 

Web Title: chennai dmk leader selavakumar seen thrashing a woman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.