दलित, आदिवासी विद्यार्थ्यांना स्वस्त धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:10 AM2018-04-24T04:10:39+5:302018-04-24T04:10:39+5:30

जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १५ किलो गहू वा तांदूळ बीपीएल दराने देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

Cheaper grains for dalit, tribal students | दलित, आदिवासी विद्यार्थ्यांना स्वस्त धान्य

दलित, आदिवासी विद्यार्थ्यांना स्वस्त धान्य

Next

एस. के. गुप्ता ।
नवी दिल्ली : आंबेडकर वसतिगृहांसह सर्व सरकारी, खासगी वसतिगृहांतील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १५ किलो गहू वा तांदूळ बीपीएल दराने देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
ही योजना मुलींच्या वसतिगृहांतील सर्व जाती-जमातींच्या विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणार आहे. यासाठी किती धान्य लागेल हे कळवण्यास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली. यंदाच ते सुरू करण्याची केंद्राची इच्छा आहे.
मुलींसाठीही योजना जातीपातीचे बंधन न राखता वसतिगृहांतील सर्वच विद्यार्थिनींना बीपीएल दराने धान्य देण्यात येईल. या योजनेद्वारे १३ लाख ८४ हजार ८४३ टन धान्यवाटप केले जाईल.

Web Title: Cheaper grains for dalit, tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार