चांद्रयान-२चे प्रक्षेपण २१ किंवा २२ जुलै रोजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:40 AM2019-07-18T05:40:57+5:302019-07-18T12:47:23+5:30

चांद्रयान-२ या अवकाशयानाचे २१ जुलै रोजी दुपारी किंवा २२ जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे.

Chandrayaan-2's launch on 21 or 22 July | चांद्रयान-२चे प्रक्षेपण २१ किंवा २२ जुलै रोजी

चांद्रयान-२चे प्रक्षेपण २१ किंवा २२ जुलै रोजी

googlenewsNext

बंगळुरू : चांद्रयान-२ या अवकाशयानाचे २१ जुलै रोजी दुपारी किंवा २२ जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या मदतीने गेल्या सोमवारी पहाटे झेपावणाऱ्या चांद्रयान२ चे उड्डाण आयत्या वेळी उद््भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले होते.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर ५२ दिवसांनी चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान १६ दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. त्यानंतर, ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. चांद्रयान-२चे या आधी प्रक्षेपण करण्याचा जो प्रयत्न झाला, त्यावेळी निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी इस्रोचे अभियंते व शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत आहेत.
>रोव्हरची भूमिका
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजे दडली आहेत, तिथे पाण्याचा अंश आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तिथे चांद्रयान-२मधील रोव्हरने केलेल्या तपासणीनंतर मिळतील.

Web Title: Chandrayaan-2's launch on 21 or 22 July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.