3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:26 PM2019-07-22T15:26:07+5:302019-07-22T15:31:51+5:30

अंतराळ विज्ञान आणि संशोधनात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  

'Chandrayaan-2' launch successfully; ISRO announced | 3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा

3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा

googlenewsNext

श्रीहरिकोटा - अंतराळ विज्ञान आणि संशोधनात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या जीएसएलव्ही एमके-3 एम-1 या प्रक्षेपकाने यशस्वीरीत्या उड्डाण करून चांद्रयान-2 ला यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले आहे. त्यानंतर इस्रोनेचांद्रयान-2 चे उड्डाण यशस्वी झाले असून, हे यान पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचल्याची घोषणा केली आहे. 



श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने  दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

आता चांद्रयान-2 चा पुढील प्रवास असा राहणार आहे 

पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार कक्षेमध्ये बदल, एपोजीमध्ये 60.4 किमीचे अंतर
22 जुलै : ‘चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार कक्षात घिरट्या घालेल. याचा पेरिजी (पृथ्वीपासून कमी अंतर) 170 किमी आणि एपोजी (पृथ्वीपासून जास्त अंतर) 39120 किमी असणार आहे. 
15 जुलै : ‘चांद्रयान-2’ जर लाँच झाले असते तर याचा पेरिजी 170.06 किमी आणि एपोजी 39059.60 किमी होणार होता. म्हणजेच एपोजीमध्ये 60.4 किमी अंतर आणले असते. तसेच, पृथ्वीच्या चारी बाजूने घालणाऱ्या घिरट्या कमी केल्या असत्या. 

 चंद्रावर पोहोचण्याच्या कालावधीत 6 दिवसांनी कमी  
‘चांद्रयान-2’ जर 15 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले झाले असते तर 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले असते. मात्र. आज 22 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच, ‘चांद्रयान-2’ हे 6 सप्टेंबरलाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. ‘चांद्रयान-2’ आता पृथ्वीच्या चारी बाजूने 5 च्याऐवजी 4 घिरट्या घालणार आहे. 

वेलोसिटीमध्ये 1.12 मीटर प्रति सेकंद वाढ
‘चांद्रयान-2’ चे आज प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्रावर जास्त वेगात जाणार आहे. आता अंतराळात याचा वेग 10305.78  मीटर प्रति सेंकद असणार आहे. जर, 15 जुलैला प्रक्षेपण झाले असते तर याचा वेग 10,304.66 मीटर प्रति सेकंद असता. म्हणजेच, आज होणाऱ्या प्रक्षेपणात ‘चांद्रयान-2’ चा वेग 1.12 मीटर प्रति सेकंद वाढविण्यात आला आहे. 
 

Web Title: 'Chandrayaan-2' launch successfully; ISRO announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.