हॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 07:32 PM2017-11-10T19:32:08+5:302017-11-10T19:48:17+5:30

जीएसटी परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार  हॉटेलमध्ये खानपान आता आणखी स्वस्त झाले आहे. यापुढे हॉटेलमधल्या बिलावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येईल.

Catering to the hotel is cheaper, it will only be 5% GST | हॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी

हॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी

googlenewsNext
ठळक मुद्देहॉटेलमधल्या बिलावर आकारण्यात येणा-या या जीएसटीच्या दरावर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती.

नवी दिल्ली - जीएसटी परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार  हॉटेलमध्ये खानपान आता आणखी स्वस्त झाले आहे. यापुढे हॉटेलमधल्या बिलावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येईल. हॉटेल एसी असो वा नॉन एसी फक्त पाच टक्केच जीएसटी आकारण्यात येईल. यापूर्वी नॉन एसी हॉटेलमध्ये 12 टक्के आणि एसी हॉटेलमध्ये 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. एखाद्या हॉटेलमध्ये एसी आणि नॉन एसी अशी व्यवस्था असताना तुम्ही नॉन एसीमध्ये काही खाल्ल तरी 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. ज्या हॉटेल्समध्ये रुमचे भाडे 7500 रुपयांपेक्षा जास्त आहे त्या हॉटेल्समध्ये 18 टक्केच जीएसटी आकारण्यात येईल. 

हॉटेलमधल्या बिलावर आकारण्यात येणा-या या जीएसटीच्या दरावर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती.  मंत्रिगटानेही हॉटेलमधला जीएसटी कमी करण्याची शिफारस केली होती. जीएसटी परिषदेने इनपुट टॅक्स क्रेडीटही संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे हॉटेल्सना आयटीसी आकारता येणार नाही. हॉटेल मालकांनी आयटीसीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाही. त्यामुळे हा कर संपवण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 28 टक्के जीएसटी कायम राहणार आहे. 

सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत. 

आसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर  28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Catering to the hotel is cheaper, it will only be 5% GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी