In the campaign, the political parties' efforts to attract GST issues are effective, business | प्रचारात जीएसटीचा मुद्दा प्रभावी, व्यापाºयांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न
प्रचारात जीएसटीचा मुद्दा प्रभावी, व्यापाºयांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न

- महेश खरे
सुरत : गुजरातेतील विधानसभा निवडणुकीत जीएसटी हा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. राहुल गांधी यांनी या टॅक्सला ‘गब्बर सिंग
टॅक्स’ असे नावच दिले आहे. जीएसटीवरून व्यापारी वर्ग सरकारवर नाराज असल्यामुळे काँग्रेस त्याचा लाभ उठवू पाहात आहे.
दुसरीकडे संसद व जीएसटी कौन्सिलच्या बैठकांत काँग्रेसचे प्रतिनिधी जीएसटीला पाठिंबा देत असून, बाहेर आल्यावर व्यापाºयांना भ्रमित करण्यासाठी विरोध दाखवतात. ते तेथे का विरोध दर्शवित नाहीत? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
जीएसटीवर सूरतसह देशातील कपडा व्यापारी नाराज आहेत. त्यांनी आपल्या समस्या अनेकदा सरकारच्या कानावर घातल्या. वित्तमंत्री अरुण जेटली सूरतमध्ये असताना आल्यानंतर कपडा व्यापाºयांनाही भेटले. आता व्यापारी मतदानानंतर १४ डिसेंबर रोजी दिल्लीला जाणार आहेत, पण त्यांची नाराजी कायम आहे.

कपडा व्यापाºयांवर काँग्रेसने केले लक्ष केंद्रित

सूरतच्या लिंबायत, मजुरा, उधना व चौर्यासी या चार मतदारसंघांत कपडा व्यापाºयांची मोठी संख्या आहे. येथे किमान एका जागी कपडा व्यापाºयाला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची मागणी
केली जात होती.

भाजपाने तर या मागणीकडे दुर्लक्ष केले, परंतु काँग्रेसने कपडा व्यापाºयाला मजुरामधून तिकीट दिले. काँग्रेसचा प्रत्येक नेता आवर्जून कपडा बाजारात जातो.

राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री शैलजा, आनंद शर्मा यांनीही कपडा व्यापाºयांच्या भेटी घेतल्या. आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे २ डिसेंबर रोजी सूरतमध्ये कपडा व्यापाºयांसमवेत चर्चा करणार आहेत.

यंदा झटका देणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तर अनेक कपडा व्यापाºयांशी घनिष्ठ संबंध आहेत. तेही आले, तेव्हा कपडा व्यापाºयांना भेटले. काही बड्या कपडा व्यापाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जीएसटीच्या मुद्द्यावरून आम्ही भाजपाला झटका देणार आहोत. त्याची सुरुवात सूरतहून होईल.

काँग्रेस बुडते जहाज
अहमदाबाद : काँग्रेस जी कामे ६०-६५ वर्षांत पूर्ण करू शकली नाही, ती कामे आम्ही ४ वर्षांत पूर्ण करावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे काय? असा सवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केला. ते म्हणाले की, आम्ही ४ वर्षांत त्यांच्यापेक्षा अधिक कामे केली आहेत. मात्र, काँग्रेसला सत्य बोलणे अवघड जात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस बुडते जहाज झाले आहे. गत साडेतीन वर्षांत काँग्रेस पक्ष २० निवडणुका हरला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी यूपीए सरकारवर हल्ला केला. काँग्रेस भारताची प्रतिमा जगात मलिन करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आम्ही धर्माचे दलाल नाही
अमरेली / वडोदरा : सोमनाथ मंदिरातील दर्शनानंतर सुरू झालेल्या वादावर राहुल गांधी यांनी आज मौन सोडले आणि आम्ही धर्माचे दलाल नाही, अशा शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला. धर्माचे प्रमाणपत्र दाखविण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असे सांगतानाच, राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, माझ्या आजीपासून कुटुंब शिवभक्त आहे. धर्म आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते म्हणाले की, विश्वास ही आमची खासगी बाब आहे. आम्ही धर्माची दलाली करत नाहीत. आम्ही याचा राजकारणासाठी वापर करू इच्छित नाहीत.


Web Title:  In the campaign, the political parties' efforts to attract GST issues are effective, business
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.