पत्नीला काळी म्हणणे पतीला पडले महागात, हायकोर्टाने मान्य केला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 01:58 PM2018-05-30T13:58:14+5:302018-05-30T13:58:14+5:30

पत्नीला काळी-कुलटा म्हणणे म्हणणे एका पतीस चांगलेच महागात पडले आहे.

To call a wife black is cruelty | पत्नीला काळी म्हणणे पतीला पडले महागात, हायकोर्टाने मान्य केला घटस्फोट

पत्नीला काळी म्हणणे पतीला पडले महागात, हायकोर्टाने मान्य केला घटस्फोट

Next

चंदिगड - पत्नीला काळी-कुलटा म्हणणे म्हणणे एका पतीस चांगलेच महागात पडले आहे. चारचौघात पाणउतारा झाल्याने  संतापलेल्या पत्नीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी करताना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने  पत्नीला काळी म्हणणे म्हटणे गैरवर्तन आणि क्रूरता असल्याचे सांगत महिलेच्या घटस्फोटास परवानगी दिली. 
त्याचे झाले असे की, महेंद्रगड येथील एका महिलेचे जेवन न बनवण्यावरून भांडण झाले. त्यावेळी पतीने चिडून तिला काळी म्हटले. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने रंगरूपावरून शेरेबाजी केल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की, पीडित पत्नी तिच्यासोबत गैरवर्तन  आणि दुय्यम व्यवहार झाल्याचे सिद्ध करण्यात यशस्वी झाली. त्यामुळे तिला नाईलाजाने वैवाहिक जीवन समाप्त करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे हे पीडित महिलेला मानसिक आणि शारीरिक स्तरावर त्रस्त करण्यात आल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे आहे."
न्यायमूर्ती एमएम बेदी आणि न्यायमूर्ती गुरविंदर सिंह गिल यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना महेंद्रगडच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात दिलेला निकाल रद्दबातल ठरवला. महिलेच्या शपथपत्रावरून तिच्यासोबत क्रुरता करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे.  एखाद्या महिलेने सासरचा त्याग करून माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर तिने कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचलले हे जाणून घेणे आवश्यक असते. या प्रकरणात महिलेसोबत क्रूरता झाल्याचे सिद्ध होत आहे, असे न्यायमूर्ती म्हणले. 

Web Title: To call a wife black is cruelty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.